उड्डाणपुलावर जळती कार आली लोकांवर धावून... उलटे पाय धरून लोकांना काढला पळ, सर्वत्र एकच गोंधळ अन् Video Viral
सोशल मीडिया आज एक असे साधन झाले आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच यावर आता सक्रिय दिसून येतात. इथे अनेक असे व्हिडिओज शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. त्याचबरोबर अनेक अपघातांचे किंवा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ देखील शेअर होत असतात आणि असाच एक नवीन व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, यात एक जळती कार भररस्त्यात लोकांच्या अंगावर धावताना दिसून आली, ज्यामुळे संपूर्ण रस्ताभर एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून आपला पळ काढला. चला काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका उड्डाणपुलावरील भयानक घटना दिसून येत आहे. रस्त्याच्या एका टोकाला चारचाकी थांबल्या आहेत तर दुसऱ्या टोकाला काही दुचाकी आणि लोक जमली आहेत. याचवेळी रस्त्याच्या मधोमध एक ज्वलंत कार थांबलेली व्हिडिओत दिसून येते. गाडीतून धूर आणि आगीचा भडका उडत असतो आणि लोक खुल्या डोळ्यांनी हे सर्व दृश्य पाहत असतात आणि तितक्यात जळत असलेली ही गाडी अचानक दुचाकी आणि लोकांचा घोळखा असलेल्या जागी वेगाने खाली घसरू लागते. हे पाहून सर्वच घाबरतात आणि जो तो आपला जीव वाचवण्यासाठी आपली गाडी घेऊन तिथून पळ काढू लागतो. व्हिडिओच्या शेवटी तर एक माणूस आपली दुचाकी तिथेच टाकतो आणि जीव वाचवण्यासाठी तसाच पळताना दिसून येतो. व्हिडिओमध्ये लोकांच्या किंकाळ्या आणि पळण्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात.
Tarzan the wonder card got real… pic.twitter.com/VKhrd1arG0
— Dogesh (@dogesh_bhai) September 1, 2025
आई ती आई असते! आपल्या पिल्लासाठी हळूच तुकडा काढला बाजूला; हृदयाला स्पर्श करणारी Viral Video
हा व्हिडिओ कोणत्या शहराचा किंवा ठिकाणचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कारला आग लागण्याचे खरे कारण काय होते हे देखील कळलेले नाही. हा व्हायरल व्हिडिओ @dogesh_bhai नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शूटिंग चालू आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खोटं आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जयपूरमधला सीन आहे हा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.