फोटो सौजन्य - Social Media
आई ती आई असते! मग ती मानवाची असो वा कोणत्याही प्राण्याची. अगदी वाघिणीच्याही तिच्या पिल्लांचे सांभाळ करतानाचे व्हिडीओ समोर येत असतात. अशामध्ये एका श्वानांची तिच्या पिल्लासाठी असणारी तळमळ कॅमेरात कैद झाली आहे. हे भावनिक दृश्य अगदी डोळ्यातून पाणी काढणारे आहे. ही व्हिडीओ @page_for_sale.___ या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला फार मोठा प्रतिसाद मिळालेलं आहे.
नक्की व्हिडिओमधील दृश्य आहेत तरी काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये जेवणाचा बेत सुरु आहे. आज जेवणाला चिकन पार्टी होणार आहे. चूल छानशी जळत आहे. मालकाने चिकनने भरलेले ताट आणून चुलीजवळ ठेवले. श्वानांपासून वाचवण्यासाठी त्यावर झाकणही ठेवला आणि त्याला काही काम आठवल्यामुळे तो तेथून निघून गेला. त्या भावनिक क्षणांची खरी सुरुवात येथून आहे. तिथे एक श्वान त्याच्या पिल्लासोबत उभा असतो. पिल्लाला ते चिकन हवे असते. कदाचित त्याला भूक लागली असावी त्या श्वानाला त्याच्या पिल्लाच्या भुकेची तळमळ दिसून येते आणि श्वान ते झाकण आपल्या दातांनी बाजूला सरकवून त्यातील चिकनचा पीस बाहेर काढतो आणि त्याच्या पिल्लासामोर देतो आणि अतिशहाणपणा न करता गपचूप ते चिकनने भरलेले ताट झाकून घेतो.”
मुळात, या व्हिडिओमध्ये आईची ममता आणि इमानदारी या दोन्ही गुणांचे दर्शन होते. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या आयडीने कॅप्शनमध्ये “Is there any language to define mothers love” असा प्रश्न विचारला आहे. एकंदरीत “अशी कोणती भाषा आहे का ज्याच्या माध्यमातून आईच्या ममतेची योग्य व्याख्या कुणी सांगू शकेल?” अशी विचारणा करण्यात आली आहे.
नेटकऱ्यांनी पोस्टखाली कमेंट्स केले आहेत. काही नेटकऱ्यांनी काळजी दाखवत नमूद केले आहे की,”त्या दोघांची नीट काळजी घ्या.” अनेकांनी दोघांचे कौतुक करत म्हंटले आहे की, “किती इमानदार आहेत ते! त्यातील एकानेही दुसऱ्या मांसाला हातही लावला नाही.”