'तुला लय मस्ती आली का?' असे म्हणत अकलूजमध्ये तरूणाला बेदम मारहाण
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर तलवारीने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. नराधम पती आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालायचा. त्यानंतर त्याने हे कृत्य केले.
यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली गावात ही घडली. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली या गावात घडलेल्या घटनेत बेबी दलुराम राठोड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दलूराम राठोड असे मारेकरी पतीचे नाव आहे.
दरम्यान, पती संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. त्याच वादातून पतीने पत्नीवर तलवारीचे घाव घातले. तलवारीने वार केल्याने बेबी राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
मुलाने केला वडिलांवर हल्ला
आईवर वार केल्यानंतर मुलाने वडिलांवर हल्ला केला. त्यात मारेकरी दत्तूराम हा जखमी झाला. हत्येची ही थरारक घटना यवतमाळच्या कारेगाव यावली येथे बुधवारी पहाटे दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी मुलाने वडगाव जंगल पोलिस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
बापाने पोटच्या मुलाला संपवलं
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना अमरावतीत दारूमुळे बापाने आपल्याच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला आणलेली दारू मुलाने प्यायल्याने वडिलांनी पोटच्या मुलाला झोपेतच मारहाण करत हत्या केली.