Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 08:29 AM
प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

Follow Us
Follow Us:

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता वर्ध्याच्या आर्वी येथील रहिवासी असलेल्या शेख शाहरुख शेख रऊफ याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

आर्वी शहरातील रहिवासी शेख शाहरुख शेख रऊफ याने काही दिवसांपूर्वी आर्वीतीलच रहिवासी प्रशांत महाजन याच्याशी वाद केला होता. याची माहिती प्रशांत महाजन याचा मुलगा टिंकेश महाजन व टिंकेशचा आतेभाऊ शुभम मोहनलाल रॉय याला मिळाल्यावर शेख शाहरुख शेख रऊफ याला जीवानिशी ठार करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचण्यात आला. त्यानंतर अली अजगर सब्दर हुसेन याने पैशाचे आमिष देत प्रकरण आपसात मिटवू असे सांगत शेख शाहरुख याला गावाबाहेर आणले. त्यानंतर टिंकेश व अली अजगर यांनी शेख शाहरूख यास मारहाण करून हत्या केली. त्याचा मृतदेह टिंकेशने आणलेल्या चारचाकी वाहनात टाकून आरोपी आर्वी येथून निघून गेले.

नंतर शुभम रॉय याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अमरावती येथे बोलावण्यात आले. त्यानेही तीन साथीदारांना घेत लेहगाव गाठले. त्यानंतर शेख शाहरूख याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या शहानूर धरणाच्या कालव्यात जाळून तेथून पोबारा केल्याची कबुली आरोपींनी दिली.

सहा जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून टिंकेश महाजन (रा. आर्वी), प्रशांत महाजन (रा. आर्वी), अली अजगर सब्दर हुसेन (रा. आर्वी), हर्षित प्रकाश गौर (रा. अंजनगाव सुर्जी) व निखिल दीपचंद गौर (रा. अंजनगाव सुर्जी) व एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कार, सात मोबाईल जप्त केले आहे.

हेदेखील वाचा : मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Web Title: Youth murdered over past enmity incident in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Murder Case
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
2

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.