Gautami patil (3)
नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो. आता असाच काहीसा प्रकार उदगीरमधून समोर आला आहे. कार्यक्रम सुरू असताना काही बेधुंद तरुणांनी तुफान राडा केला. काही तरुण टॅावरवर चढले तर काहींनी मागे प्रेक्षकांना दिसत नसल्यामुळे काही खोडसाळ तरुणांनी दगड मारले. तो दगड एका तरुणाला लागल्याने चागंलाच राडा झाला. महत्त्वाचं म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती.
[read_also content=”पूनम पांडेला सुनावल्यानंतर मुनव्वर फारुकी स्वत:च झाला ट्रोल, ‘ही’ कमेंट करुन आला गोत्यात! https://www.navarashtra.com/movies/munavar-faruqui-get-trolled-for-his-comment-on-poonam-panday-alive-news-nrps-504433.html”]
उदगीरमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नेहमीप्रमाणे तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी तरुणांनी एकच गोंधळ केला. मात्र, कार्यक्रम स्थळी निट कार्यक्रम दिसत नसल्याने काही हुल्लडबाज तरुण थेट नेत्यांचे बॅनर फाडत टॉवरवर चढले होते. आयोजकांनी अनेक वेळेस तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तरुण ऐकत नव्हते.
कार्यक्रम ऐन रंगात असताना काही तरुणांनी यावेळी गोंधळ घातला. स्टेजजवळ काही तरुण नाचत असल्यामुळे पाठीमागील लोकांना दिसत नव्हतं. ते तरुण त्यांना खाली बसण्यास सांगत होते. मात्र, कुणीही ऐकत नव्हतं. यावेळी काही खोडसाळ तरुणांनी समोरील तरुणावर दगड मारले. एका तरुणाच्या डोक्यात मागील बाजूस दगड लागल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. एकाच वेळी अनेक ठिकाणी गोंधळ सुरू असल्याने नेमकं काय झालं हे कोणालाही लक्षात आलं नाही. प्रचंड गोंधळातच कार्यक्रम पार पडला.