डेहराडून: केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात (Kedarnath Temple) एका महिलेने नोटा फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टिका होऊ लागली होती. या घटनेचं गांभीर्य बघता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गर्भगृहात पुजार्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अधिका-यांकडून खुलासा मागितला असून चौकशीनंतर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
[read_also content=”‘प्रवास नतरं आधी या पोरींना आवरा’, मेट्रोमध्ये केस स्ट्रेट करणाऱ्या तरुणीवर भडकले लोकं; म्हणाले ही मेट्रो आहे की ब्युटी पार्लर? https://www.navarashtra.com/viral/a-girl-straightening-her-hair-in-the-delhi-metro-video-goes-viral-nrps-418777.html”]
त्यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांना दोषींवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. सोशल मिडिया युजर्सनीही या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत महिलेला तसंच पुजार्यांनी असं करण्यापासून रोखलं नसल्याची टीका केली आहे. गर्भगृहातील सोन्याऐवजी पितळेचे थर वापरणे आणि सुमारे १.२५ अब्ज रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे केदारनाथ मंदिरही चर्चेत आले आहे, तेथे चारधाम तीर्थ पुरोहित महापंचायत, राजकीय पक्षांसह काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केदारनाथ मंदिर का इन दिनों एक नया वीडियो वायरल।
तीर्थ पुरोहितों के सामने महिला भगवान शिव के लिंग पर उड़ा रही नोट।
#Kedarnath #Uttarakhand pic.twitter.com/VREH73JTou
— Sarita Tiwari (@saritatiwariuk) June 19, 2023
बीकेटीसी आणि सत्ताधारी भाजपने याला हिंदुविरोधी मानसिकता असलेल्या क्षुल्लक राजकीय घटकांकडून पसरवलेले षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गढवाल हिमालयातील 11,760 फूट उंचीवर असलेल्या केदारनाथ धामला यात्रेकरू भेट देत आहेत आणि रविवारपर्यंत 9,88,151 भाविक बाबा केदारला वंदन करण्यासाठी आले आहेत.