Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्याच्या बॅटने मी नेहमीच कमाल केली आहे’; उधारीच्या बॅटवर अभिषेक शर्माने ठोकलेय शतक

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने उधार घेतलेल्या बॅटने शतक ठोकले, बॅटच्या मालकाची स्वस्तात सुटका अभिषेक शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात धमाकेदार खेळी करीत विस्फोटक शतक ठोकले. अवघ्या 47 धावांमध्ये 100 धावा ठोकल्यामुळे भारताची धावसंख्या 234 पर्यंत पोहचली. अर्थातच त्याममध्ये ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंहच्या धावसंख्येचे मोठे योगदान आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 08, 2024 | 06:21 PM
Abhishek Sharma thanked Shubman Gill

Abhishek Sharma thanked Shubman Gill

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma Say Special Thanks to Shubman Gill : अभिषेक शर्माने उधार घेतलेल्या बॅटने शतक ठोकले, अन् बॅटचा मालक स्वस्तात आऊट झाला. अवघ्या 2 धावा करून शुभमन तंबूत परतला. अभिषेक शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात धमाकेदार खेळी करीत विस्फोटक शतक ठोकले. कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माने पुढच्याच सामन्यात दमदार शतक झळकावून इतिहास रचला. सामनावीर म्हणून निवड झालेल्या अभिषेकने पत्रकार परिषदेत सांगितले की, या शतकी खेळीत त्याने कर्णधार शुभमन गिलच्या बॅटचा वापर केला होता. त्याच्या बॅटचा वापर करीत मी नेहमीच मोठी कामगिरी केल्याचेदेखील त्यांने सांगितले.

अभिषेकने सांगितली शुभमनच्या बॅटची कमाल

Two extremely special phone 📱 calls, one memorable bat-story 👌 & a first 💯 in international cricket!

𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!

A Hundred Special, ft. Abhishek Sharma 👏 👏 – By @ameyatilak

WATCH 🎥 🔽 #TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/0tfBXgfru9

— BCCI (@BCCI) July 8, 2024

खूप गयावया करून मागितली बॅट, तो देतपण नव्हता

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक 7 जुलै रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात झळकावले. अभिषेकने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याने ही बॅट खूप गयावया करून शुभमनकडून घेतली होती. मला ज्या ज्या वेळी सामन्यात कमबॅक करायचे असते तेव्हा मी शुभमनच्या बॅटने कमाल केली आहे, असे सांगितले. अभिषेक शर्माला पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुस-या सामन्यात 47 चेंडूत 100 धावांची खेळी करून सामनावीर म्हणून निवडले गेले, तर त्याने कर्णधार शुभमन गिलच्या बॅटने हा पराक्रम केला असल्याचे सांगितले. अभिषेक पुढे जाऊन म्हणाला की, शुभमन गिलचे खरोखर मनापासून आभार आहे, ज्यामुळे मी अशी मोठी कामगिरी करू शकलो.

आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक
अभिषेक शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. 6 जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले खातेही उघडू न शकलेल्या अभिषेकने रविवारी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्फोटक शतक झळकावले. या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाच्या शतकी खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेवर 100 धावांनी विक्रमी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

For his maiden 💯 in his second T20I, Abhishek Sharma receives the Player of the Match 🏆#TeamIndia win by 100 runs and level the series 1️⃣ – 1️⃣

Scorecard ▶️ https://t.co/yO8XjNqmgW#TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/b72Y9LaAiq

— BCCI (@BCCI) July 7, 2024

अभिषेकचे शतक, बॅटचा मालक गिल केवळ दोन धावांवर स्थिरावला
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अभिषेकने या शतकासाठी कर्णधार गिलच्या बॅटचा वापर केल्याचा खुलासा केला आणि त्याने असे करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही उघड केले. अभिषेक म्हणाला, आज मी शुभमनच्या बॅटने खेळलो, मी यापूर्वीही हे केले होते. जेव्हा जेव्हा मला धावांची गरज असते तेव्हा मी त्याची बॅट मागतो. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे चांगले मित्र आहेत हे इथे नमूद करणं गरजेचं आहे. दोघेही 2018 च्या अंडर-19 विश्वचषक संघात एकत्र होते, ज्याचे नेतृत्व पृथ्वी शॉ करत होते. दोघेही पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र खेळतात. विशेष म्हणजे अभिषेकला आपली बॅट सोपवणाऱ्या गिलला या सामन्यात चार चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.

फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांकडूनही धमाका
अभिषेकचे शतक, रुतुराज गायकवाडच्या 46 चेंडूत नाबाद 77 धावा आणि रिंकू सिंगची 22 चेंडूत 48 धावांची स्फोटक खेळी यांच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेच्या गोलंदाजीसमोर एकूण 234 धावा केल्या. उत्कृष्ट फलंदाजीनंतर रवी बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार या गोलंदाजांच्या जोरावर भारताने पुनरागमन सुरू ठेवले. अवेशच्या 3/15, बिश्नोईच्या 2/11 आणि मुकेशच्या 3/37 स्पेलच्या जोरावर, भारताने सिकंदर रझाच्या झिम्बाब्वेला केवळ 134 धावांवर बाद करण्यात यश मिळविले. आता 100 धावांनी विजय मिळवून भारत 10 जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने प्रवेश करेल.

Web Title: Abhishek sharma special thanked shubman gill because abhishek hit a destructive century with shubman gills bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • T20 International

संबंधित बातम्या

ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने रचला इतिहास! आयसीसी रँकिंगमध्ये ‘या’ दिग्गजांनंतर ‘असा’ कारनामा करणारा तो पहिलाच..
1

ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने रचला इतिहास! आयसीसी रँकिंगमध्ये ‘या’ दिग्गजांनंतर ‘असा’ कारनामा करणारा तो पहिलाच..

IND W vs ENG W : भारताचे इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाचे लक्ष्य! आज रंगणार चौथा टी-२० सामना; ‘या’ खेळाडूंवर असेल खास नजर
2

IND W vs ENG W : भारताचे इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाचे लक्ष्य! आज रंगणार चौथा टी-२० सामना; ‘या’ खेळाडूंवर असेल खास नजर

ICC T20 Ranking : आयसीसी T20 क्रमवारीत तिलक वर्माचा दबदबा! पाकिस्तानच्या Babar Azam सह ‘या’ भारतीय फलंदाजाला टाकले मागे..
3

ICC T20 Ranking : आयसीसी T20 क्रमवारीत तिलक वर्माचा दबदबा! पाकिस्तानच्या Babar Azam सह ‘या’ भारतीय फलंदाजाला टाकले मागे..

SRH vs LSG : SRH च्या Abhishek Sharma ने क्रीडा जगतात उडवली खळबळ! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तो एकमेव भारतीय.. 
4

SRH vs LSG : SRH च्या Abhishek Sharma ने क्रीडा जगतात उडवली खळबळ! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तो एकमेव भारतीय.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.