Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?

भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का? अशी चर्चा होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 06:45 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामना
  • कोचच्या विधानातून अभिषेक शर्माचा बचाव
  • संजू सॅमसनचं काय?
Abhishek Sharma confirmed to play : गुरुवारी, 5 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का? अशी चर्चा होती. मात्र, प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

IND Vs ENG सेमीफायनलच्या पीचवरुन हेड कोच झाले ‘गंभीर’, क्युरेटरवरुन नाराजी? नक्की काय घडला प्रकार?

अभिषेक शर्माचा बचाव

गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी सराव सत्रादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिषेक शर्माची बाजू सावरली. मोर्केल यांनी स्पष्ट केलं की, ‘उद्याचा दिवस अभिषेकसाठी एक नवीन सुरुवात असेल. त्याच्याकडे आपली क्षमता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्याने याच मैदानावर यापूर्वी इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं आहे. त्यामुळे तो या मॅचमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.’

या विधानावरून हे स्पष्ट होते की, संघ व्यवस्थापन आजही अभिषेकच्या आक्रमक खेळावर विश्वास ठेवून आहे आणि त्याला सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यातून वगळण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.

संजू सॅमसनचं काय?

अभिषेक शर्माला पाठिंबा मिळाल्यामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजू सॅमसनचे चाहते त्याला सलामीला किंवा मधल्या फळीत खेळवण्याची मागणी करत होते. मात्र, अभिषेकला ‘बॅक’ करण्याच्या कोचच्या निर्णयामुळे संजूला या ऐतिहासिक सामन्यात बाहेरच राहावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत त्याने 97 धावांची दमदार खेळी केली होती. पण तरीही सेमीफायनल सामन्यात त्याला संघात जागा मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

वानखेडेचा ‘कनेक्शन’ आणि रणनीती

वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने याआधी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. हीच बाब लक्षात घेऊन प्रशिक्षकांनी त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाविरुद्ध अभिषेकची आक्रमक सुरुवात भारतासाठी गेमचेंजर ठरू शकते, असे व्यवस्थापनाला वाटते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल 5 मार्च 2026 रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबईमध्ये खेळण्यात येणार आहे. कोचने अभिषेक शर्माला संघात कायम ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर आता संघात वेगळा काय ट्विस्ट येईल हा मोठा प्रश्नच आहे. आता चेंडू अभिषेक शर्माच्या कोर्टात आहे. प्रशिक्षकांनी दाखवलेला हा विश्वास तो सार्थ ठरवणार की पुन्हा एकदा स्वस्तात बाद होऊन टीकाकारांच्या निशाण्यावर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दोन वेळा सेमीफायनलमध्ये लढले

भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . हा सामना सलग तिसऱ्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणून खेळला जात आहे. 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे.

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

Web Title: Abhishek sharma confirmed to play in semi finals coach morne morkel gave big hints know what he said about sanju

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket
  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • indian cricket team
  • Sanju Samson
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.