
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 परिसरात 7 जून ला झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान झाले. विमानतळ प्रशासनाने रविवारी (8 जून) ही माहिती अधिकृतपणे दिली. या घटनेमुळे विमान सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल-2 वर पार्क करण्यात आलेल्या एअर इंडियाच्या तीन नॅरोबॉडी विमानांना ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट (GSE) धडकले. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे हे उपकरण त्यांच्या जागेवरून सरकले आणि विमानांवर आदळले. ही उपकरणे एअर इंडिया इंजिनिअरिंग आणि इंडिगो यांच्या मालकीची होती.
Air India Building: एअर इंडियाची २३ मजली इमारत आता महाराष्ट्र …
घटनेनंतर संबंधित तीनही विमाने तत्काळ सेवेतून बाहेर काढण्यात आली. विमानतळ ऑपरेटरने सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने विमानांची सविस्तर तपासणी करण्यात येत आहे. या संदर्भात विमानतळ प्रशासनाने म्हटले, “अचानक बदललेल्या हवामानामुळे ग्राउंड सपोर्ट उपकरणे त्यांच्या स्थानावरून हलली आणि पार्क केलेल्या विमानांना धडकली. त्यामुळे विमानांचे नुकसान झाले असून त्यांची तपासणी सुरू आहे.”
याशिवाय विमानतळ ऑपरेटरने आणखी एक महत्त्वाचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून हवामानातील या अचानक बदलाबाबत विमानतळ प्रशासन किंवा विमान कंपन्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या घटनेबाबत विविध स्तरांवर चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान
एअर इंडियाने या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, एका विमान कंपनीतील अधिकाऱ्याने सांगितले की, “तीन एअर इंडिया विमानांबरोबरच इतर काही विमान कंपन्यांच्या विमानांनाही खराब हवामानाचा परिणाम झाला आहे.”
त्याच अधिकाऱ्याने पुढे सांगितले, “नुकसान झालेल्या तीन विमानांपैकी दोन विमाने लवकरच पुन्हा सेवेत दाखल होतील, तर तिसऱ्या विमानाच्या दुरुस्तीसाठी थोडा अधिक वेळ लागेल.”