रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज(Narayan Rane` Bail Application Rejected) रत्नागिरी न्यायालयाने(Ratnagiri Court) फेटाळला आहे. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वरच्या गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे तणावाची स्थिती आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.
[read_also content=”नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक, कुठ जाळपोळ तर कुठं तोडफोड, पाहा कोणत्या जिल्ह्यांत झालं आंदोलन? https://www.navarashtra.com/latest-news/shiv-sena-is-aggressive-against-narayan-rane-lets-see-nrms-173142.html”]
नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.
रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले.त्यानंतर सध्या संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे . यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, राणेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अटक करायला आलेले पोलिस अटक वॉरंट दाखवत नाहीत. अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांकडे केला. पण पोलिस आमच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, असे जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जोपर्यंत राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा जठार यांनी दिला आहे.