Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन् झोपा केला कारभार; अशोक मोने यांची टीका

एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची 'शो बाजी' सुरु आहे. हा बैल गेला अन् झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा वास्तववादी सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 23, 2021 | 06:25 PM
सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन् झोपा केला कारभार; अशोक मोने यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जेव्हा कोरोना महामारीचा कहर सुरु होता. तेव्हा सातारा पालिकेने सातारकरांसाठी साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु केलं नाही. आता कोरोना रुग्ण कमी होत असताना आणि लस सर्वत्र उपलब्ध असताना सत्ताधाऱ्यांनी शहरात ‘मोफत लसीकरण’ अशी बॅनरबाजी सुरु केली आहे. एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची ‘शो बाजी’ सुरु आहे. हा बैल गेला अन् झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा वास्तववादी सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने (Ashok Mone) यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा शहरात करोनाचे थैमान सुरु होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. लस मिळत नसल्याने अनेकांनी स्वखर्चाने लस घेतली. कोरोनामुळे हैराण झालेले सातारकर मोठ्या आशेने सत्ताधाऱ्यांकडे पाहत होते. पण, पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडर यातच सत्ताधारी गुरफटले होते. आता करोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शहरात लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत. मात्र, त्यातही ‘शो बाजी’ करून सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. लसीकरण घेतले जात आहे ही बाब चांगलीच आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचले याबद्दल सत्ताधाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत.

सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन् झोपा केला कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, आता डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यावर पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे, कचरा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी करोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सातारकरांना नेहमीच बसला आहे आणि आताही बसत आहे. लसीकरण कॅम्प आणि तुमची बॅनरबाजी सुरु राहू द्या पण, डेंग्यूपासून सातारकरांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, असे मोने यांनी म्हटले आहे.

Web Title: Ashok mone criticizes satara municipality work nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2021 | 06:25 PM

Topics:  

  • Satara Municipality

संबंधित बातम्या

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू
1

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.