नवी दिल्ली : २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक लवकरच होणार आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाला आतापासून तयारी करावी लागणार आहे. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आहे, त्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या ३ ते ४ वर्षांत ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्मा सध्या ३४ वर्षांचा असून तो ३-४ वर्षांपेक्षा जास्त खेळू शकणार नाही. टीम इंडियामध्ये असे काही मजबूत खेळाडू आहेत, जे ‘हिटमॅन’ रोहित शर्मापेक्षाही धोकादायक आहेत आणि लवकरच टीम इंडियाचा पुढचा सलामीवीर बनू शकतात.
जाणून घेवूया, ते तीन खेळाडू कोण आहेत?
१. ऋषभ पंत
ज्याप्रमाणे रोहित शर्माला मधल्या फळीतून सलामीवीर बनवण्यात आले, त्याचप्रमाणे ऋषभ पंतलाही टीम इंडियाचा सलामीवीर बनवले जाऊ शकते. टीम इंडियासाठी सर्वात मोठा फायदा हा असेल की ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे, जो सलामीला कोणत्याही विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऋषभ पंत टीम इंडियाचा सलामीवीर बनला तर तो या ठिकाणी दीर्घकाळ वादळ निर्माण करू शकतो.
ऋषभ पंतही कर्णधारपदात माहिर आहे. येत्या काही दिवसांत तो सलामीसोबतच कर्णधारपदातही रोहित शर्माशी स्पर्धा करेल. ऋषभ पंतकडेही धोनीइतकीच ताकद आहे. २००७ मध्ये जेव्हा धोनीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले होते, तेव्हा त्याची खेळीही चांगली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा यष्टीरक्षकाला खेळ जास्त कळतो, त्यामुळे पंतचा वापर धोनीप्रमाणे होऊ शकतो, हे सर्वांना माहीत आहे.
२. ईशान किशन
टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशन फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही तरबेज आहे. आयपीएल २०२१ मध्ये, मुंबईला आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादविरुद्ध मोठा विजय आवश्यक होता, ज्यामध्ये इशान किशनने ३२ चेंडूत ८४ धावा केल्या. इशान किशनच्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
ईशान किशनची ही धमाकेदार खेळी पाहून सगळेच थक्क झाले. मुंबई आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. पण, इशान किशनने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली. इशान किशन येत्या काही दिवसांत रोहित शर्माची जागा घेऊ शकतो आणि एकहातीपणे सामन्याचे चित्र बदलू शकतो.
३. पृथ्वी शॉ
दमदार फलंदाज पृथ्वी शॉ स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. भारतीय क्रिकेट संघात सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ हा प्रबळ दावेदार मानला जातो, जो रोहित शर्माची जागा भरून काढू शकतो. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉला अनेकदा टीम इंडियात संधी मिळाली आहे. त्याने आपल्या जलद फलंदाजीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा जोडीदार मानला जातो, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त फटके आहेत. आगामी काळात पृथ्वी शॉ ‘हिटमॅन’ रोहित शर्माची पानं कापून टीम इंडियाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विजेतेपदही पटकावले आहे. २०१९ अंडर-१९ विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या युवा स्टार्सनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तेव्हा शॉ त्या संघाचा कर्णधार होता. शुबमन गिल आणि शिवम मावी सारखे स्टार्सही त्यावेळी याच टीमचा भाग होते.