Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘केसानं गळा कापणार’ वरुन रंगले राजकारण! भाजप नेते राणेंचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाबाबत वक्तव्य केले होते. नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2024 | 07:20 PM
‘केसानं गळा कापणार’ वरुन रंगले राजकारण! भाजप नेते राणेंचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आगामी निवडणूकांपूर्वी राज्यातील दोन्ही आघाडींमध्ये जागावाटपावरुन बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महायुतीमधील शिंदे गट व भाजप यांच्या नेत्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरु झाले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाबाबत वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिलं. हा वाद संपलेला नसून नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम?

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला त्रास दिला जातोय, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपमधील काही लोक अतिशय घृणास्पद काम करत आहेत. राज्यातल्या काही नेत्यांना मोदी-शाहांनी समज दिली पाहिजे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून आलेल्यांचा केसाने गळा कापू नका, असा इशारा कदमांनी दिला होता.

आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची…

— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) March 8, 2024

नारायण राणेंचं ट्वीट

भाजप नेते नारायण राणे यांनी देखील शिंदे गट व भाजपच्या या वादामध्ये उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे. ”आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल.” असं खरमरीत उत्तर नारायण राणे यांनी रामदास कदम यांना दिलं आहे.

Web Title: Bjp leader narayan rane replies to shinde group ramdas kadam political news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Narayan Rane
  • Ramdas Kadam
  • Rane

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
1

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
2

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
3

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
4

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.