नागपूर (Nagpur). शासनाने (The government) सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत (all district collectors) अॅम्फोटेरीसिन इंजेक्शनचे वाटप (to dispense amphotericin injections) शासकीय रुग्णालयांना (to government hospitals) पुरेशा प्रमाणात केल्यानंतर ते खासगी रुग्णालयांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, मेडिकल रुग्णालयाला हे इंजेक्शनच कमी मिळाल्याने सोमवारी येथील म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) (black fungus) रुग्णांना ते दिले गेले नाही. त्यामुळे या इंजेक्शनच्या वाटपाबाबत वाद (controversy) निर्माण झाला असून खासगी रुग्णालयांना (to private hospitals) जास्त इंजेक्शन वितरित झाले कसे, असा प्रश्न मेडिकलचे रुग्ण विचारत आहेत.
मेडिकलमध्ये आज सोमवारी सकाळी अॅम्फोटेरीसिनचे केवळ १० इंजेक्शन होते. येथे सध्या म्युकरमायकोसिसच्या ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर संवर्गातील एकेका रुग्णाला पाच वा त्याहून जास्त इंजेक्शन रुग्णाच्या स्थितीनुसार दिले जाते. परंतु येथे कमी इंजेक्शन असल्याने केवळ दोनच रुग्णांना हे इंजेक्शन दिले गेले.
[read_also content=”नागपूर/ विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ; महाविद्यालयाच्या चुकांच्या परिणामाची विद्यार्थ्यांना शिक्षा https://www.navarashtra.com/latest-news/time-to-deprive-students-of-exams-punish-students-for-the-consequences-of-college-mistakes-nrat-133855.html”]
इतर एकाही रुग्णाला इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे येथील रुग्ण आता इंजेक्शन वितरणाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत आहेत. काही रुग्णांकडून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली जाणार आहे.
सध्या पूर्व विदर्भातील म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक म्हणजे ९३३ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. या विषयावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. डॉ. गुप्ता यांनी अडीच हजार इंजेक्शनची मागणी केल्याचे सांगितले. एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर अनेक रुग्णांना हे इंजेक्शन मिळाले नसल्याचे मान्य केले.
मेयोत रुग्णांना इंजेक्शन दिल्याचा दावा
मेयो रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे ३४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे वार्डात १३८ अॅम्फोटेरीसिन इंजेक्शनचे वाटप झाल्याने रुग्णांना ते मिळाले. परंतु मंगळवारी तातडीने पुरवठा न झाल्यास येथेही मेडिकलसारखेच हाल होण्याचा धोका आहे. परंतु मेयोतीलही काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन मिळाले नसल्याचा आरोप केला.