मुंबई: लसींचा साठा मर्यादित(corona vaccination shortage) असल्याने लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही लस मिळण्यात दिरंगाई होत आहे. मुंबई शहरात(mumbai city) विभाग स्तरावर सुरू झालेल्या स्थानिक लसीकरण केंद्रांवरही(vaccination centers) स्थानिकांना लस मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र आणि तिथल्या गर्दी विभाजनाचा हेतू मागे पडत असल्याची स्थानिक रहिवाशांची तक्रार आहे. विभागीय लसीकरण केंद्रांवर रहिवाशांना लस मिळत असल्याने त्या केंद्रांचा उद्देश असफल होत आहे का, असा प्रश्नही स्थानिक विचारत आहे.
[read_also content=”पालिकेच्या कळवा रुग्णालयात चक्क तलवारीने कापण्यात आला केक,शव विच्छेदन आगाराबाहेर घडलेल्या घटनेने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/latest-news/cake-cut-by-sword-in-corporations-kalwa-hospital-nrsr-127490.html”]
मुंबई पालिकेने लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरील नोंदणी बंधनकारक केली आहे. लस मिळण्यासाठी लसीकरण केंद्रांवरील गर्दीची दृश्ये पाहून पालिकेने नोंदणीचा निर्णय घेतला आहे. तसेच लसीकरण केंद्रांचे विकेंद्रीकरण होउन स्थानिकांना गर्दीत उभे राहू नये, म्हणून शहरातील २२७ विभागात स्थानिक पातळीवर लसीकरण केंद्रे सुरू करण्याचाही निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लगेचच वाजतगाजत स्थानिक लसीकरण केंद्र सुरू करुन श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिथेही लशींचा साठा अल्प स्वरुपात उपलब्ध असल्याने रहिवाशांची कुंचबना झाली आहे.
विभागीय केंद्रांमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात लशी मिळतील, हा हेतू सध्यातरी पूर्ण होताना दिसत नाही. त्यातच हे कमी म्हणून की काय अनेक विभागीय केंद्रांवर लस घेण्यासाठी येणारे स्थानिक विभागातील नसल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी लस घेण्यासाठी येणाऱ्यांकडे स्थानिकांनी विचारणा केली असता त्यातील काही जण त्या विभागातील रहिवासी नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विभागीय लसीकरण केंद्रांचा उद्देश सफल होतो का, असाही प्रश्न विचारला जात आहे.
गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा भागातील लसीकरण केंद्रांवरदेखील लस घेण्यासाठी आलेले काही जण मुंबईतील विविध भागातील होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच पद्धतीचा अनुभव शहरातील अनेक केंद्रांवरही आल्याचे सांगण्यात येते. लशींचा तुटवडा असल्यानेच ही वेळ आल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे. लसीकरणाचा गोंधळ संपला तर विभागीय केंद्रांमुळे स्थानिकांना लस मिळण्यात काहीही त्रास होणार नसल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे.