Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांचा एक फोन आला अन् अजित पवारांनी अयोध्येला जायचं केलं कॅन्सल; जाणून घ्या कारण…

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र दोघेही या अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे कारण अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 21, 2024 | 04:54 PM
मुख्यमंत्र्यांचा एक फोन आला अन् अजित पवारांनी अयोध्येला जायचं केलं कॅन्सल; जाणून घ्या कारण…
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी (Ram Mandir Inauguration) अवघे काही क्षण उरले आहेत. देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले असून राज्यामध्ये देखील राममय वातावरण झाले आहे. उद्या राज्यामध्ये शासकीय सुट्टी देण्यात आली असून शासकीय इमारती सजवण्याचे आदेश देखील राज्य सरकारने (State Govt) दिले आहेत. मात्र अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र दोघेही या अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे कारण अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याविषयी मत मांडले. अजित पवार म्हणाले, देशातल्या इतर काही राज्यांनी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपल्या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शासकीय इमारतींमध्ये रोषणाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे रामभक्त त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम करणार आहेत. अनेक कार्यालयांमध्ये कार्यक्रमांची तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुढे अजित पवार यांना अयोध्येमध्ये मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का नाही असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. खरंतर, मी आणि मुख्यमंत्री आजच या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार होतो. परंतु, काल मी उरूळी कांचनला असताना मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. ते मला म्हणाले, ‘आपल्याला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आहे. मात्र उद्या या कार्यक्रमाला केवळ आपण दोघेच न जाता काही दिवसांनी आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाऊया. आपण एक तारीख ठरवू आणि त्या दिवशी अयोध्या दौरा करू. आपण दोघेच तिथे जाणं आणि बाकीच्यांना उद्या तिथे जाता न येणं योग्य नाही. त्यामुळे आपण नंतर सर्वांना घेऊनच जाऊया.’ कारण उद्या इतरांना तिथे जाण्याची परवानगी नाही. राज्याच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही उद्या अयोध्येला जाणार नाही. असे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अयोध्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे दिले.

Web Title: Dcm ajit pawar gives real reason why not attending ayodhya ram mandir inauguration nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 04:54 PM

Topics:  

  • ayodhya
  • Cm Eknath Shinde
  • Ram Mandir Inauguration

संबंधित बातम्या

Elon Musk Father : एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच
1

Elon Musk Father : एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच

विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
2

विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला

रामनगरी अयोध्येत लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण; तीन महिने उलटूनही शिपायाला….
3

रामनगरी अयोध्येत लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण; तीन महिने उलटूनही शिपायाला….

अनोखी रामभक्ती! पुण्यातील भाविकाकडून अक्षय तृतीयेनिमित्त अयोध्येत 11000 आंब्यांचा भोग
4

अनोखी रामभक्ती! पुण्यातील भाविकाकडून अक्षय तृतीयेनिमित्त अयोध्येत 11000 आंब्यांचा भोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.