
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी काल दोन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आज (8 नोव्हेबर) मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच सामुहिकरित्या आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या हत्येचा कट कसा आणि कुठे रचला गेला. यात कोण कोण कोण सामील होते, याबाबत जरांगे पाटील यांनी गंभीर दावे केले आहेत.
माझा घात करणार होते, खून करणार होते की रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते. मी शरण येत नव्हतो म्हणून काय काय करणार होते. ते जे होईल त्यासाठी मी समर्थ आहे. पण तुम्ही भूतकाळात जाऊन चिकित्सक व्हा, मी सगळ्या मराठा नेत्यांनाही सांगत आहे.मुख्यमंत्री साहेब एक शेवटचं सांगतो, याची चौकशी करा, प्रत्यक्षात आरोपीसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडेंनीच सामुहिक कट रचला आहे. खून, घातपात, गोळ्या औषध खायला घालून मला संपवण्याचा प्रयत्न झालाय. याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे आहेत. बीड आणि जालना जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या कानाने ही गोष्ट ऐकली आहे. हत्येचा कट रचणारे मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहेत. बीडच्या चारपाच जणांचे नाव आहेत. त्यात गंगाधर नाना काळकुटे यांचंदेखील नाव आहे त्यांनाही संरक्षण देणे गरजेचे आहेत.
मनोज जरांगे म्हणाले,”बीडच्या रेस्ट हाऊसमध्ये धनंजय मुंडेंनी एक बैठक घेतली होती. त्याठिकाणी मुंडे आणि कांचन यांच्यात एक बैठक झाली. त्यात आणखी दोघांना सामील करण्यात आले. मल मारण्यासाठी धनंजय मुंडेंनी दोन ते अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. मुंडेंनीच हे सर्व करायला लावले होते. मला गाडीने उडवायचा यांचा प्लान होता, असे जरांगे पाटील म्हणाले.
आंतरवालीत बडे नावाचा माणसाची 10-11 लोक आहेत. धनंजय मुंडेंना तुम्ही आम्हाला गाडी घेऊन द्या आम्ही गाडीने ठोकतो, असं हे दोघे धनंजय मुंडेंना सांगितले. त्यावर धनंजय मुंडेने त्यांच्याकडे दुसऱ्या राज्यातील पासिंगची जुनी गाडी आहे. धनंजय मुंडेंच्या कांचन नावाचे माणसाने सर्व आरोपीची भेट घेतली होती.
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; दोन संशयित ताब्यात
“सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती. दिवाळीच्या सुमारास पुन्हा एकदा माझ्या हत्येचा कट रचण्यात आला. या प्रकरणात आणखी दहा- अकरा जण सामील आहेत. आरोपींनी तर म्हटलं होतं, ‘तुम्ही गाडी द्या, आम्ही गाडीला गाडी ठोकतो.’ दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं, तरी हत्येचा कट रचवणारे म्हणजे धनंजय मुंडेच आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.