बीडच्या बड्या नेत्याने रचला माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगे यांनी थेट नावच सांगितल.
“मराठा समाजाने शांततेची भूमिका घ्यायची आहे. सतर्क रहाल सावध राहा, हुशार व्हा, आपण सावध नसू तर आपल्याला जे आरक्षण मिळाल ते मिळालं नसतं. मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी आता विषय गांभीर्याने घ्यावा. आज माझ्यावर वेळ आली, उद्या मराठा नेत्यांवरही अशी वेळ येऊ शकते, करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा अधिक जबाबदार असतो. असल्या वृत्तीचा नायनाट करावाच लागेल. ” असे आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, पोलिसांनी त्यांना पकडा, किंवा सोडून द्याव त्याच्याशी घेणंदेण नाही. कारण १०० -१५० प्रमुख सगळ्या पक्षाचे लोक बसले होते.जनतेच्या प्रशासनात खरं काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण सत्य आम्हाला कळालं आहे.कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, बीडमध्ये धनंजय मुंडें आणि कांचन यांच्यात एक बैठक झाली. त्यात आणखी दोघांना घेण्यात आलं. मला मारण्यसाठी तीन पर्याय निवडण्यात आले.यातला पहिला मला बदनाम करण्याचा प्लॅन होता. खोटे रेकॉर्डिंग, व्हिडीओ बनवण्याचे काम देण्यात आले. पण त्यांना कुठेच काहीच सापडलं नाही. दुसरा पर्याय होता माझा थेट खून करण्याचा. आणि तिसरा पर्याय थेट घातपाताचा, गाडीला गाडी धडकवून, गोळ्या औषध भरवून मला संपवण्याचा प्लॅन होता. पण मी यात कुठेच अडकलो नाही. मला संपवण्यासाठी २ ते अडीच कोटींचा व्यवहार ठरला होता.
राज्यातील अनेक नेत्यांना धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांच्या तपासाधीन असल्याने त्याविषयी अधिक खुलासा करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले की, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयीचे कॉल रेकॉर्ड आपल्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, वंजारी समाजातील काही अधिकारी आणि ओएसडी यांना हाताशी धरून धनंजय मुंडे हे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचे सूतोवाच जरांगे यांनी केले. या आरोपांमुळे बीड आणि मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापले आहे.






