सगळीकडे गणेशत्सव हा मोठ्या उत्साहत सुरु झाला आहे, या दिवसा मध्ये गणरायची मनोभावे पूजा केली जाते. तेव्हा गणपतीच्या आवडीच्या सर्व वस्तू ठेवले जातात, फुलापासून ते खाण्याच्या गोष्टी पर्यंत सेवा होते आणि गणेशोत्सवात फुलांचं एक वेगळं महत्त्व आहे, गणपतीला तुळस सोडून सर्व फुलं आवडतात पण गणपतीला लाल रंगाचे फुलं खुप प्रिय आहेत त्यात जास्वंद सर्वाधिक प्रिय असं फुल आहे.
जास्वंद चे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. साधारणपणे जास्वंदीच्या १०० हुन अधिक जाती आहेत. आपल्याला एकेरी, डबल लाल जास्वंद व पांढरे जास्वंद ओळखीच्या आहेत. औषधांत उपयोग करतात. याशिवाय जास्वदींचा चहासुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय आफ्रिका आणि इराण मध्ये अनेक औषधांमध्ये जास्वंद फुलांचा वापर केला जातो.