Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन तयार आहे. ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 03:05 PM
Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात ६९३ उपाययोजनांचा मोठा आराखडा
  • पाणीटंचाई टाळण्यासाठी मोठी तयारी; ५३९ गावांसाठी १६ कोटींचा निधी प्रस्तावित
  • उन्हाळ्याच्या झळा सुरू! चंद्रपूर प्रशासन सज्ज, ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू
चंद्रपूर: उन्हाळा आणि पाणीटंचाई असे समीकरण ठरलेलेच असते. यंदाही पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील ५३९ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वेळेआधीच नियोजन करत १६ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ५३९ गावांसाठी एकूण ६९३ विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतच प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे.

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

या आराखड्याची खास बाब म्हणजे, तो केवळ तातडीच्या उपायांपुरता मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ३ टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५, दुसरा टप्पा १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६, तर तिसरा टप्पा १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या तिन्ही टप्प्यांसाठी एकत्रितपणे १६.५५ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये विहिरींची दुरुस्ती व खोलीकरण, गाळ काढणे, झिरे वा बुडकी घेणे, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन विंधन विहिरी व कूपनलिका उभारणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, हातपंपांची देखभाल, तसेच टँकर व बैलगाडीमार्फत पाणीपुरवठ्याचा समावेश आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात परिणामकारक उपाययोजनांचा समावेश करून निधीची मागणी करण्यात आली आहे. ५३९ गावांना टंचाईची झळ बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून मंजुरी मिळताच कामांना वेग देण्यात येईल. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल. – सुमित बेलपत्रे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?

प्रभावी आणि व्यापक नियोजन

गत काही वर्षांत जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. भूजल पातळी घटणे, वाढती लोकसंख्या, शेतीसाठी वाढलेला पाण्याचा वापर आणि अपुऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरी व नळयोजना कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा अधिक प्रभावी आणि व्यापक नियोजन केले आहे.

Web Title: Chandrapur news 539 villages face water scarcity threat administration prepares rs 1655 crore action plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Chandrapur
  • NAVARASHTRA
  • Water Crisis

संबंधित बातम्या

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा
1

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण
2

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी
3

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी

मालदीवला जाणाऱ्यांसाठी मोठा इशारा! कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही, मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते; कारण जाणून घ्या
4

मालदीवला जाणाऱ्यांसाठी मोठा इशारा! कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही, मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते; कारण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.