
अनोखा विश्वविक्रम! अवकाशात पातळ दोरीवर चालत दाखवला जीवघेणा स्टंट, अंगावर शहारा आणणारा Video Viral
जर्मनीचे दोन साहसप्रेमी स्लॅकलाइन ॲथलीट फ्रीडी कुहेने आणि लुकास इर्मलर यांनी आपल्या कर्तृत्वाने असा पराक्रम गाजवला की जग थक्क झाले. या दोघांनी 2.5 किमी (सुमारे 8,200 फूट) उंचीवर असलेल्या दोन गरम हवेच्या फुग्यांमधील दोरीवर चालत नवा विश्वविक्रम रचला. त्याने आपलाच जुना विश्वविक्रम मोडला आहे. त्याने स्वत:ला केवळ दोरीने बांधून आणि कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय हा थरारक आणि साहसी पराक्रम पूर्ण केला. फ्रिडी कुहेनेच्या धैर्याचे आता सोशल मीडियावर फार कौतुक केले जात आहे. सध्या त्याचा श्वास रोखणारा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील थरार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील मात्र आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुमचे होश उडवून टाकेल. यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणण्यास प्रवृत्त करतील. तुम्हाला उंचीही भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला क्षणार्धात चक्रावून टाकेल. व्हिडिओत, अवकाशातील काही दृश्य दिसत आहे. यात एक हॉट ऐअर बलून देखील आहे. या एक हॉट ऐअर बलूनला जोडून एक रशी हवेतच दुसऱ्या टोकाला अडकवल्याचे दिसून येत आहे आणि यातच एक व्यक्ती या पातळ दोरीवर आपला तोल सावरत अवकाशात चालताना दिसत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दोरीवरून चालताना त्याला वाऱ्याच्या जोरदार झुंजीला सामोरे जावे लागले, परंतु त्याच्या जिद्द आणि आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानावर मात करतो. हा थरारक पराक्रम पाहून अनेकजण आता थक्क झाले आहेत . असे करून फ्रेडी आणि लुकास यांनी दाखवून दिले की माणसाच्या मर्यादा केवळ त्याच्या धैर्यावर आणि सरावावर अवलंबून असतात.
RECORD ⬇️Los funambulistas alemanes Lukas Irmler y Friedi Kuehne establecen un nuevo récord mundial atravesando una cuerda floja tendida a 2.500 metros de altura entre dos globos aerostáticos. 👍 pic.twitter.com/exOvLsBJog — José Alvarez (@IngJoseAlvarez) November 14, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हे यश वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे आणि सततच्या सरावाचे फळ आहे. फ्रिडी आणि लुकास म्हणाले की स्लॅकलाइनिंगमध्ये तज्ञ होण्यासाठी ते बऱ्याच काळापासून छोटे मोठे धोकादायक स्टंट करत आहेत. हळूहळू उंची आणि आव्हान दोन्ही वाढवत त्याने ही पातळी गाठली. हे केवळ शारीरिक क्षमतेचेच नव्हे तर मानसिक ताकदीचे आणि टीम वर्कचे उदाहरण आहे. या थरारक स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, लोक त्यांचा हा स्टंट पाहून आश्चर्यचकित होत आहे तसेच त्यांच्या धाडसाचे कौतुकही केले जात आहे. जीवघेण्या स्टंटचा हा व्हिडिओ @José Alvarez नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.