इंटरनेटवरील सोशल मीडियाची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दररोज शेकडो हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात. या गमतीशीर दुनियेत कधी आणि काय पाहायला मिळेल हे कुणीच सांगू शकत नाही. हे असे व्यासपीठ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने मजेदार व्हिडिओ पाहिले आणि अपलोड केले जातात. यातील काही व्हिडिओ शेअर होताच प्रसिद्ध होतात. नुकताच एक रस्ता अपघाताशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये वाहनात बसलेले सर्व प्रवासी अवघ्या काही सेकंदातच अक्षरशः रस्त्यावर भाज्यांप्रमाणे कोसळताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पाहून आता लोकांना आता यावर हसावं की थक्क व्हावं ते सुचत नाहीये.
लक्ष वेधून घेणारा हा व्हिडिओ अल्पावधीतच लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी त्याला लाइकही केले आहे. यामध्ये एक वाहन रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत असल्याचे पाहायला मिळते. त्यात किलोहून अधिक प्रवासीही बसले आहेत. मात्र, त्याच क्षणी चालकाने भरधाव वेगात असलेले वाहन अचानक पलटी केले. यामुळे वाहनाच्या मागे आरामात बसलेले प्रवासी काही सेकंदात रस्यावर पडतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष म्हणजे, यांनतर गाडी थेट पुढे निघून जाते आणि या लोकांकडे अजिबात वळून बघत नाही. फ्रेममधला हा सीन सगळ्यात पाहण्यासारखा आहे आणि कोणालाही हादरवून टाकेल. खाली पडल्यानंतर लगेचच सर्व प्रवासी उभे राहिल्याचे दिसून येते. व्हिडिओतील ही घटना पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही पण लोक या व्हिडिओची आता फार मजा लुटताना दिसून येत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @gieddee नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले आहे. तसेच बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे अजिबात गमतीशीर नाही… लहान मुलंही आहेत.. टू-वे रस्ता झाला असता तर ते धोकादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल प्रत्येकाला मनोरंजन हवे असते. कुणाला काही होऊ नये म्हणून प्रार्थना करा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






