नृत्यांगणा गौतमी पाटीलची (Gautami Patil)ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. तिच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतचं असतो. त्यामुळे तिच्या डान्सपेक्षा तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यामुळे ती कायम चर्चेत असते. आता ती गौतमी आगामी “द महाराष्ट्र फाईल्स” (Maharashtra files) या आगामी मराठी चित्रपटात थिरकताना दिसणार आहे. गौतमीच्या डान्सची जादू आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने गौतमीला पारंपारिक वेशभूषेत पाहीले आहे. पण आता या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्लच्या लूकमध्ये दिसणार आहे.
[read_also content=”83 कोटीचा ड्रेस, 180 कॅरेट डायमंड हार, मेट गालात डोळे दिपवून टाकणारी स्टाईल करणारी सुधा रेड्डी कोण आहे? https://www.navarashtra.com/movies/who-is-sudha-reddy-who-wore-dress-worth-rupees-83-crore-in-met-gala-2024-nrps-530975.html”]
महाराष्ट्रामध्ये गौतमीचे लाखो चाहते आहेत. तिला डान्सबार गर्लच्या लुकमध्ये पाहण्याची उत्सुकता तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. गौतमीला डान्स बार गर्लच्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ होत आहेत. “द महाराष्ट्र फाईल्स ” हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात, देशात व जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहात रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड आहेत.
या चित्रपटात मुख्य भुमिका मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड अशा तगड्या कलाकारांची फौज आहे. तर, या चित्रापटाला नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली असून विक्रांत अंटील हे क्रियेटीव्ह प्रोडूसर आहेत. शादाब अख्तर व विकास मिश्रा हे कार्यकारी निर्माता आहेत संजय आर, किरण कोळी व सुनीता गोन्सलवीस हे प्रोडक्शन मॅनेजर आहेत, सोम चव्हाण यांनी व्हिज्युअल प्रोमोशन केले आहे.
हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित व दुर्बल घटकावर व त्यांच्या समस्यावर आधारीत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये सर्व सिनेमागृहात , भारतात व जगभरात मिळून 850 चित्रपटगृहात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये शांताबाई या फेमस गाण्यावर सनि लियोनी थिरकणार आहे. हरियानाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे. व गौतमी पाटिल ह्या डान्सबार गर्लच्या रूपात मराठी चित्रपटामध्ये हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे