“गुलाबी साडी” नंतर “शेकी”ची सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ, संजू राठोडच्या गाण्यात दिसली बिग बॉस फेम अभिनेत्री
आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर, अफाट प्रतिभावान गायक संजू राठोड आपल्या नव्या गाण्याच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवलेल्या संजू राठोडचे गेल्या वर्षी “गुलाबी साडी”गाणं रिलीज झालं होतं. त्यानंतर आता “शेकी”(Shaky) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “शेकी”(Shaky)गाणं हे संजू राठोडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख आणि आमिर हळहळला; भाईजान म्हणाला, “निर्दोष व्यक्तीला मारणं म्हणजे…”
‘नऊवारी’, ‘गुलाबी साडी’ आणि ‘काली बिंदी’च्या पाठोपाठ संजू राठोडचं आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संजू राठोडच्या नव्या गाण्याची तुफान चर्चा चालू आहे. संजूच्या नव्या गाण्याचं नाव “शेकी” असं आहे. इतरत्र गाण्यांप्रमाणेच संजूचं हे गाणं देखील कमालीचं लोकप्रिय ठरेल, यामध्ये शंका नाही. संजूच्या गाण्यांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. त्याच्या गाण्याचा चाहतावर्ग फक्त देशातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायलं मिळतंय.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सेटवर ‘त्या’ दुर्दैवी घटनेनंतर काय घडलं? स्वत: रितेश देशमुखने दिली माहिती
“शेकी” हे गाणं संजू राठोडच्या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर गाण्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘Shaky’ या नवीन गाण्याचा लेखक आणि गायक स्वतः संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. “शेकी” गाण्यामध्ये संजूसोबत प्रसिद्ध बिग बॉस १७ फेम ईशा मालविय झळकणार आहे. पहिल्यांदाच ईशा एका मराठी कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही टिव्ही सीरियरलच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करणारी ईशा आता “शेकी” गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला आली.
“शेकी” या गाण्याबद्दल संजू राठोडने सांगितले की, “ ‘शेकी’ गाणं तयार करणं म्हणजे ट्रेडिशनल आणि ग्लोबल यांच्यात एक बारीक दोरावर चालण्यासारखं होतं. मी देसी आत्मा जपताना नव्या साउंड्सचा प्रयोग करायचा प्रयत्न केला. ईशासोबत पहिल्यांदा काम करणं एक जबरदस्त अनुभव होता. ती स्क्रीनवर खूपच ऊर्जा आणि ग्रेस घेऊन आली. त्यामुळे गाण्याचा मूडच बदलून गेला. ‘शेकी’ हे मराठी पॉप संस्कृतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या माझ्या प्रवासातील पहिलं पाऊल आहे. गाण्यानंतर येणारी पुढची मोठी लाट असेल, हे नक्की.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; दिग्दर्शकाची मन सुन्न करणारी पोस्ट
“गुलाबी साडी”च्या प्रचंड यशानंतर आणि “काली बिंदी”वरील सततच्या प्रेमानंतर, संजू राठोड आता मराठी पॉप संस्कृतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत. पुढे जाऊन ते मराठी संगीताच्या आत्म्याला जागतिक पॉप सेंसिबिलिटीसोबत मिसळणार आहेत. एम-पॉपच्या या हंगामात संजू लोक-पॉपच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय पातळीवर एक प्रभावशाली आवाज म्हणून उदयास येणार आहेत – आणि भारताच्या बहुभाषिक व सतत बदलणाऱ्या संगीतविश्वात मराठी पॉपला एक नवीन स्थान मिळवून देणार आहेत. “शेकी” ही केवळ एका हिट गाण्याची पुढची कडी नाही – तर हे एक ठाम स्टेटमेंट आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम का झाले ट्रोल ? नेटकरी म्हणाले- ‘लज्जास्पद’
संजू राठोड यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, आपली सांस्कृतिक ओळख जपत, ते कोणत्याही सीमांचे बंधन मानत नाहीत. त्यांच्या सततच्या प्रयोगशीलतेमुळे, अनोख्या शैलीमुळे आणि सखोल सांस्कृतिक जाणीवेमुळे संजू राठोड एम-पॉपचे झेंडे वाहणारे कलाकार म्हणून नाव कमावत आहेत – जे मराठी संगीताला जागतिक पॉप प्रभावांशी सुंदररीत्या एकत्र आणतात. त्यांचा आवाज हा धाडसी, जमिनीवरचा आणि पूर्णपणे त्यांचा स्वतःचा आहे. त्याच्या आकर्षक साऊंडमुळे आणि सांस्कृतिक समृद्धतेमुळे “शेकी” लवकरच सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये गाजणार, हे निश्चित.