Pravin Tarde Shared Post On Pahalgam Terror Attack Lost Close Friend
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला आहे. २२ एप्रिलला झालेल्या ह्या हल्ल्यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली आहे. त्या २६ जणांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. मृत पावलेल्या पर्यटकांमध्ये, महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे.
मेघना सिंह आणि शंतनु चौधरीच्या लग्नात राजकारणी आणि सिनेतारकांची मांदियाळी; वाचा यादी
पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पावलेल्या संतोष जगदाळे हे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचे खास मित्र होते. संतोष यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दिग्दर्शक प्रवीण तरडेंना धक्का बसला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, “आतंकवाद आज घरात आला.. माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला.. मित्रा संतोष माफ कर आम्हाला, आम्ही काही करू शकत नाही..” प्रवीण तरडेंनी शेअर केलेली ही पोस्ट वाचून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. संतोष जगदाळे यांचं दहशतवादी हल्ल्यात निधन झाल्यामुळे सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पहलगाम हल्ल्यानंतर दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम का झाले ट्रोल ? नेटकरी म्हणाले- ‘लज्जास्पद’
तर, दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडेंनीही पोस्ट शेअर करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. आपला संताप व्यक्त करताना स्नेहल तरडे म्हणाल्या, “त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही केवढी खेदाची बाब आहे. मला उघडपणे घाण बोलायचं आहे, खूप शिव्या देऊनही मन शांत होणार नाही.” पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती त्यांची २६ वर्षीय मुलगी आसावरी जगदाळे हिने पीटीआयला दिली आहे. हे प्रवीण तरडेंचे जवळचे मित्र होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तर रायगडमधील दिलीप देसले, डोंबिवलीचे अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. पहलगाममधील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरूष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या.
पहलगाम हल्ल्यावर अमिताभ बच्चनने धरले मौन? पुन्हा एकदा ‘या’ गूढ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल!