मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) कथित आत्महत्ये प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची जियाची आई राबिया खान यांनी केलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावली. आपला तपास यंत्रणेवर विश्वास असल्याचे खंडपीठाने आपल्या निर्णयात नमूद केले.
[read_also content=”राज्यभरात पाऊस, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/rain-across-the-state-warning-of-heavy-rain-for-the-next-three-days-in-some-state-including-maharashtra-nrps-325256.html”]
२०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने जियाच्या आत्महत्येचा तपास करत होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सुरज पांचोलीला अटकही केली होती. या नऊ वर्ष जुन्या प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा, अशी मागणी करणारी याचिका जियाची आई राबिया खान हिने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करताना जियाची हत्या करण्यात आली होती, असा दावा राबियाने केला होता. या प्रकरणाचा तपास प्रथम करत मुंबई पोलीस करत होते. त्यांच्या तपासात काही त्रुटी आणि चुकीचा दृष्टिकोन लक्षात आल्याने राबिया खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर जुलै २०१४ मध्ये तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता असा युक्तिवाद अँड. शेखर जगताप आणि अँड. सायरुचिता चौधरी यांनी केला.
[read_also content=”अनुरागजी, आमची केडीएमसी फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट; मनसे आमदाराचे खोचक ट्विट https://www.navarashtra.com/maharashtra/anuragji-our-kdmc-is-just-smart-in-setting-offensive-tweet-of-mns-mla-nrgm-325255.html”]
तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला असल्याचा दावा सीबीआयतर्फे अँड. संदेश पाटील यांनी केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत अशी याचिका दाखल करून याचिकाकर्ता स्वतःचा खटला कमकुवत करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले राबियाची याचिका फेटाळून लावली.