
The Mumbai High Court has stayed the Maharashtra Cricket Association elections! The future of 400 new members hangs in the balance.
The Mumbai High Court has stayed the MCA elections :मुंबई उच्च न्यायालयाकडून मंगळवारी होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सर्वोच्च परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामध्ये त्यांनी ४०० नवीन सदस्यांच्या समावेशाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये मावळते अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना असे निरीक्षण नोंदवले की नवीन सदस्यांची भरती ज्या पद्धतीने केली गेली आहे, ती प्रथमदर्शनी घाईघाईने करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या आरोप करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने हा निकल दिल आहे. २० डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या मतदार यादीत नवीन सदस्यांच्या समावेशात पक्षपातीपणा असल्याचा आरोप देखील याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
नवीन सदस्यांमध्ये रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार, त्यांचे सासरे सतीश मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवकहा देखील समावेश आहे, ज्यांच्याकडून आरोप करण्यात आला आहे, बहुतेक नवीन सदस्यांचा क्रिकेटशी काही एक संबंध नाही. त्यांच्या मते, हे पाऊल केवळ काही व्यक्तींना एमसीए त्यांच्या स्वतःच्या खाजगी संस्थे म्हणून चालवण्याची परवानगी देण्यात यावा यासाठी उचलला गेला असल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नवीन सदस्यांची यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग पहिल्या दृष्टीक्षेपात सामान्य आणि पारदर्शक दिसत नव्हता. त्यामुळे निवडणुका थांबवणे आवश्यक होते. न्यायालयाने पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडल्याचे दिसत आहे. मागील काही वर्षांपासून, विरोधी गटांकडून रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एमसीएच्या कारवायांवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. या न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रियेचा गंभीर कायदेशीर आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे दिसत आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे केवळ एमसीए निवडणुकीच्या वैधतेवरच परिणाम होणार नाही तर नवीन सदस्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया किती पारदर्शक आणि निष्पक्ष होती हे देखील ठरवता येते. आता याबाबत विविध क्रिकेट अधिकारी आणि समर्थक आता ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे डोळे लावून बसले आहेत.