स्वित्झर्लंड
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून स्वित्झर्लंडची ओळख आहे. फिरण्यासाठीचे हे एक परफेक्ट स्पॉट आहे. जगभरातून अनेक पर्यटक इथल्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येथे येत असतात. स्वित्झर्लंडला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र बजेट काही केल्या बसत नाही. तुम्हीही स्वित्झर्लंडला जाण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आज आम्ही तुम्हाला कमी खर्चात भारतातून स्वित्झर्लंडची सफर कशी करावी याची सविस्तर माहिती सांगत आहोत.
भारत ते स्वित्झर्लंड हे अंतर अंदाजे 6187 किमी इतके आहे. तुम्ही नवी दिल्ली ते स्वित्झर्लंडपर्यंत फ्लाइटने जाऊ शकता, सुमारे 11.34 तासांचा प्रवास केल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकता. नवी दिल्लीहुन स्वित्झर्लंडला जाण्याची स्वस्त तिकिटे अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कमी खर्चात जायचे असल्यास जाण्यासाठी ऑफ सीजन निवडा. ऑफ सीझनमध्ये प्रवास करताना तिकीट आणि हॉटेल्सच्या किमती स्वस्त होतात. फ्लाइट तिकिटाच्या किमतीबद्दल बोलणे केले तर भारत ते स्वित्झर्लंडच्या विमानाच्या तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती सुमारे 30 हजार रुपये असू शकते.
पश्चिम-मध्य युरोपमध्ये स्वित्झर्लंड आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. इथे इथे बर्फानी झाकलेल्या टेकड्या, तलाव, धबधबे आणि बहारदार हिरवळ पाहायला मिळते. त्याचा अद्भुत सौंदर्यामुळे इथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. अनेक कपल्स हनिमून डेस्टीनेशन म्हणून या जागेला विशेष पसंती दर्शवतात. चित्रपटांमध्ये स्वित्झर्लंडची दृश्ये पाहून अनेकांना इथे जाण्याची इच्छा होते मात्र आर्थिक परिस्थिती आड येते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये स्वित्झर्लंडच्या दृश्याची मजा कशी घेऊ शकता, याविषयी सविस्तर सांगत आहोत.
फ्लाइट तिकिटांव्यतिरिक्त, बजेटमध्ये हॉटेल्स मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगचा आधार घेऊ शकता
ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला स्वस्त किमतीत अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स, होमस्टे किंवा गेस्ट हाऊस मिळतील
तसेच स्वित्झर्लंडमध्ये फिरण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट वाहतुकीऐवजी सार्वजानिक वाहतुकीचा पर्याय निवडू शकता
याशिवाय स्विस ट्रॅव्हल पासही बनवता येतो, हा पास पर्यटकांसाठी डिझाइन केला आहे, ट्रेन, बस किंवा बोटीने तुम्हाला प्रवास करता येऊ शकतो
हेदेखील वाचा – जणू स्वर्गच भासावा अशी महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणे, जीवनात एकदा तरी या ठिकाणांना नक्की भेट द्या!