
Switzerland bomb blast
पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला; युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले
स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, स्विस शहर क्रॅन्स मोटांना येथील बारमध्ये हा स्फोट झाला आहे. स्विस पोलिसांनी गुरुवारी (१ जानेवारी २०२६) सकाळी स्फोट क्रॅन्स मोंटाना येथील लक्झरी अल्पाइन स्की रिसॉर्टमध्ये झाल्याचे सांगितले. या स्फोटानंतर भीषण आग लागली असून यामुळे अनेक लोक त्यामध्ये अडकलेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सध्या आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे आणि त्यांना रुग्णलायात नेण्याचे कार्य सुरु आहे. स्फोट झाला त्यावेळी सर्वजण नवीन वर्षाचा आनंद साजरा करत होते. बारमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे प्रचंड गर्दी होती.
स्वित्झर्लंडच्या व्हॅलेस कॅन्टमधील पोलिस प्रवक्ते गाएटन लाथियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला हे सध्या स्फोट झालेले नाही. परंतु या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यूचा धोका पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा स्फोट नवीन वर्षाच्या पहाटे १.३० वाजता झाला असल्याचे वृत्त मिळाले आहे. या स्फोटामुळे लोकांच्या नवीन वर्षाच्या आनंदात दु:खचा डोंगर कोसळला आहे.
माध्यमांनी दिलेल्या फोटो आणि व्हिडिओनुसार, स्फोट झाल्यानंतर संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात घेरली होती. लोक जीव वाचवण्यासाठी ओरडत होते, रडत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फूटजेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. हा स्फोट नेमका कसा झाला? दहशतवादी हल्ला होता का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेचा तपासही सुरु करण्यात आला आहे.
🚨 BREAKING FINALLY DID IT: An explosion in Switzerland, Crans-Montana, killed many people & injured others at a bar in the ski resort town.#Islam #Switzerland #CransMontana #HappyNewYear2026 #NewYear2026 #Iran #Trump #Israel #USA #UK #NYC 🇮🇳🇮🇱🇺🇸 Jai Hind pic.twitter.com/yc0RYFcbIp — Bhāratavarṣam (@OriginsOfIndia) January 1, 2026
Ans: स्वित्झर्लंडमध्ये स्विस शहर क्रॅन्स मोटांना येथील बारमध्ये नवीन वर्षाच्या पहाटे १.३० वाजता भीषण बॉम्बस्फोट झाला आहे.
Ans: स्वित्झर्लंडमधील बार बॉम्बस्फोटातीत जखमींचा आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. परंतु संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे वृत्त स्विस पोलिसांनी दिले आहे.