Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Bar Owner Silence: स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स-मोंटाना बारमध्ये लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू झाल्यानंतर मालक जॅक मोरेट्टी यांनी शोक व्यक्त केला. फाउंटन मेणबत्त्या आगीचे कारण असल्याचा संशय आहे, ज्यामुळे उत्सव शोकात बदलले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 03, 2026 | 01:04 PM
switzerland club fire bar owner jacques moretti breaks silence news

switzerland club fire bar owner jacques moretti breaks silence news

Follow Us
Close
Follow Us:
  •  स्वित्झर्लंड क्लब आगीच्या दुर्घटनेनंतर मालक जॅक मोरेट्टी यांनी मौन सोडले असून, “आम्ही जेवण आणि झोप विसरलो आहोत,” अशा शब्दांत आपला शोक व्यक्त केला आहे.
  •  शॅम्पेनच्या बाटल्यांवरील ‘फाउंटन मेणबत्त्यां’मुळे छताने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत आनंदाचे रूपांतर ४० जणांच्या मृत्यूत झाले.
  •  क्लबमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि बाहेर पडण्यासाठी असलेला अत्यंत अरुंद रस्ता (Exit Point) यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Jacques Moretti interview Crans-Montana fire : नव्या वर्षाचे स्वागत आनंदाने करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांवर काळाने झडप घातली. स्वित्झर्लंडच्या अतिशय प्रसिद्ध अशा ‘क्रॅन्स-मोंटाना’ स्की रिसॉर्टमधील ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) या लक्झरी बारमध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण जगाला सुन्न केले आहे. या दुर्घटनेत ४० निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला, तर ११९ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या थरारानंतर अनेक दिवसांपासून गायब असलेले बार मालक जॅक मोरेट्टी (Jacques Moretti) यांनी अखेर समोर येत आपले मौन तोडले आहे.

मालकाची भावनिक साद: “हे एक दु:स्वप्न आहे”

जॅक मोरेट्टी यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:स्वप्न आहे. “त्या रात्रीपासून मी आणि माझी पत्नी जेसिका जेवलो नाही की झोपलो नाही. डोळे मिटले की समोर फक्त तो भीषण अग्नी दिसतो,” अशा शब्दांत त्यांनी आपला पश्चात्ताप व्यक्त केला. त्यांची पत्नी जेसिका ही आगीच्या वेळी बारमध्येच होती, सुदैवाने तिला किरकोळ दुखापत झाली, पण तिने जो थरार पाहिला त्यातून ती अजूनही सावरलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

एका चुकीने पेटला मृत्यूचा वणवा

तपास पथकाने या आगीचे कारण शोधून काढले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शॅम्पेनच्या बाटल्यांवर ‘फाउंटन मेणबत्त्या’ (Fountain Candles) लावण्यात आल्या होत्या. जेव्हा या बाटल्या उंचावण्यात आल्या, तेव्हा त्यातील ठिणग्या छताला लागल्या. छताचे सजावट साहित्य अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही सेकंदात रौद्र रूप धारण केले. ३०० हून अधिक लोक उपस्थित असलेल्या हॉलमध्ये अवघ्या काही मिनिटांत काळोख आणि विषारी धूर पसरला.

🚨🇨🇭🇫🇷 FLASH INFO – Jacques Moretti et son épouse Jessica, ressortissants français, géraient le bar de Crans-Montana (VS) où au moins 40 personnes ont péri. Le gérant d’origine corse est connu de la justice française pour des affaires de proxénétisme et a été incarcéré il y a… pic.twitter.com/sJE0OZtvg9 — SuisseAlert (@SuisseAlert) January 3, 2026

credit : social media and Twitter

अरुंद रस्ता ठरला मृत्यूचा सापळा

या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्यामागे क्लबची रचना कारणीभूत ठरली. बारमधील ‘एक्झिट’ गेट अत्यंत अरुंद होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला आणि बाहेर पडण्यासाठी लोकांची चेंगराचेंगरी झाली. जिन्यावरील गर्दीमुळे अनेक लोक अडकले आणि धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. जॅक मोरेट्टी यांनी दावा केला आहे की, त्यांनी २०१५ मध्ये हा बार घेतला होता आणि सुरक्षा तपासणी वेळेवर केली होती, मात्र अरुंद रस्त्याबाबतच्या त्रुटी आता उघड झाल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

तपास आणि कारवाई

स्विस अधिकारी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. जॅक मोरेट्टी यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. सध्या संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये शोककळा पसरली असून, अनेक देशांनी आपल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वित्झर्लंडमधील बार आगीत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण आगीत एकूण ४० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ११९ जण जखमी झाले आहेत.

  • Que: आगीचे मुख्य कारण काय होते?

    Ans: प्राथमिक तपासानुसार, शॅम्पेनच्या बाटल्यांवरील फाउंटन मेणबत्त्यांमधून उडालेल्या ठिणग्या छताला लागल्यामुळे ही आग लागली.

  • Que: ही घटना स्वित्झर्लंडमध्ये नेमकी कुठे घडली?

    Ans: ही घटना स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्ट क्रॅन्स-मोंटाना (Crans-Montana) येथील 'ले कॉन्स्टेलेशन' बारमध्ये घडली.

Web Title: Switzerland club fire bar owner jacques moretti breaks silence news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Fire News
  • international news
  • switzerland

संबंधित बातम्या

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
1

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
2

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी
3

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

Brazil Bus Accident: दक्षिण ब्राझीलमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 7 जखमी
4

Brazil Bus Accident: दक्षिण ब्राझीलमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 7 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.