
Switzerland bomb blast
स्वित्झर्लंड हादरलं! New Year च्या सेलिब्रेशनला गालबोट; स्विस बारमधील बॉम्बस्फोटाने खळबळ
स्फोटानंतर पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडच्या क्रॅन्स मोंटाना शहरात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाल असून अनेक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रिसॉर्टमध्ये लोकांची प्रचंड गर्दी होती. स्फोटानंतर इमारतीला आग लागून यामध्ये अनेक लोक अडकले होते. स्फोटाच्या वेळी १०० हून अधिक लोक बारमध्ये होते.
सध्या या स्फोटाची सखोल चौकशी सुरु आहे. स्फोटाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी रेगा हेलिकॉप्टर उतरताना दिसले होते. यावेळी हा स्फोट झाला होता. सध्या हा स्फोट फटाक्यांमुळे झाला असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतेही पुरावे आढळले नसल्याने पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. स्विस पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारच्या तळघरात हा स्फोट झाला आहे.
या घटनेची काही व्हिडिओ आणि फोटो देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओंमध्ये बारच्या जवळील रोडचे दृश्य दिसत असून यामध्ये रिसॉर्टच्या इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. तसेच फोटोंमध्ये इमारतींच्या मलब्याखालून लोकांना बाहेर काढले जात असल्याचे दिसत आहे. या स्फोटा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्रॅन्स मोटांना हे स्वित्झर्लंडमधील सर्वात लोकप्रिय शहर आहे. हे स्वित्झर्लंडमधील आलिशान हिल स्टेशन मानले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे १,५०० किलोमीटर उंचीवर स्थित आहे. येथील आलप्सचे दृश्य अत्यंत मनमोहक दृश्य आहे.
Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने