बीड : बीडमध्ये काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाण्यात विनायक मेटे यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देत मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे नालायक सरकार असून दुजाभाव करणार सरकार आहे. जर विनायक मेटे वर गुन्हा दाखल होत असेल तर मुंबईतील मेट्रो उदघाटनासाठी एकत्र अलेलेल्यांवर देखील गुन्हे दाखल करा, अशी मागणी मेटेंनी केली.
[read_also content=”मावळच्या वाझेंना दीड वर्षापूर्वी घरी बसवले; आमदार शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला https://www.navarashtra.com/latest-news/mla-sunil-shelke-criticizes-on-bala-bhegade-nrka-138913.html”]
तसेचं चौकशीला आम्ही सामोरं जाऊ, पळ काढणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर देखील गुन्हा दाखल करावा, अन्यथा या सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे. हे सिद्ध होईल असं विनायक मेटे म्हणाले.