हातकणंगले : प्रति शिवसेनेने केलेली आघाडीमध्ये शिवसैनिक तीनच आहेत. बाकीचे दुसऱ्या पक्षाचेच आहेत, शेतकऱ्याच्या पदरात जास्तीत जास्त कसा लाभ पडेल यांची तरतुद करू. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर्जदाराला ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणार आहे. पिक कर्जाची मर्यादाही वाढवणार असल्याचे सूचक वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले. नेतेमंडळी जरी एकत्रित आली असलो तरी प्रत्येकाने आपआपल्या विभागामध्ये ठरावधारक मतदार यांच्या भेटीगाठी घेऊन छ्त्रपती शाहू विकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने आयोजित प्रचार मेळाव्यात हसन मुश्रीफ बोलत होते. या कार्यक्रमात आमदार राजू बाबा आवळे म्हणाले, पाच वर्षात जिल्हा बँक नफ्यात आणली, आता ही बँक देशात एक नंबरची कशी होईल, शेतकऱ्याचे हित जपण्यासाठी ठराव धारक मतदारानी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र बसून राजकारण न करता बँकेला आणखीन उभारी देण्यासंर्दभात आमचे एकमत झाले आणि आम्ही एकत्रित आलो, कोणी अफवा पसरवत असेल त्यांचे नाव जाहीर करा, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल.
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या, जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारेल अस वाटत नव्हते. मात्र, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने यशाची घौडदौड सुरू केली. तेव्हापासून यशाचा आलेख हा चढताच आहे. आता मात्र छत्रपती शाहू आघाडीला निवडून द्या, बँकेत देशपातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाही. मी शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही. फक्त शेतकऱ्याची ही संस्था आहे ती टिकणे फार गरजेचे आहे.
आमदार विनय कोरे म्हणाले, दुर्दैवाने या बँकेची निवडणूक लागली आहे. शेतकऱ्याचे हित जोपसणारी ही जिल्हा बँक असून, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून ही आघाडी अस्तिवात आली. जिल्हाच्या प्रगतीवर जर खोडा येत असेल तर काही उपयोग नाही. त्यामुळे प्रमुख चार पक्ष एकत्रित आलो.
या कार्यक्रमात माजी खासदार कलापाआण्णा आवाडे, जि.प सदस्य, अरुण इंगवले, अशोकराव माने, गोकूळचे चेअरमन विश्वास पाटील, प्रसाद खोबरे, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, मोहनलाल माळी, माजी सभापती महेश पाटील, नगरसेवक नितीन जांभळे, बी. के. चव्हाण, अमर पाटील, रविंद्र माने, भगवान जाधव, डी.बी. पिस्टे, दिलीप पाटील, गिरीष इंगवले, संभाजी पवार, शहाजी पाटील, प्रकाश सातपूते, अरुण पाटील, सर्जराव माने, उदय पाटील, बाबासो चौगुले, भाऊसो आवळे.पी.एम पाटील, प्रदीप तोडकर, मदन कांरडे स्वागत व प्रस्ताविक माजी आमदार राजीव आवळे यांनी केले. तर आभार झाकीर भालदार यानी मानले.






