Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना घडत आहे, मग दहशत कोणाची?’, सुजय विखेंचा विरोधकांना सवाल

आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथेतर सामान्य माणसाच्या आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना मोठ्या घडत आहे मग दहशत कोणाची असा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2024 | 04:16 PM
'आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना घडत आहे, मग दहशत कोणाची?', सुजय विखेंचा विरोधकांना सवाल

'आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना घडत आहे, मग दहशत कोणाची?', सुजय विखेंचा विरोधकांना सवाल

Follow Us
Close
Follow Us:

गिरीश रासकर, अहमदनगर: जोर्वे गावाने आजपर्यत केवळ विकासाच्या कामावर विखे परीवाराला साथ दिली. विकास काय असतो हे विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे. आता तालुक्यातील अन्य गावात युवकांच्या सहकार्याने विकासाचे परीवर्तन असेच घडवायचे आहे. तालुक्याने ३५ वर्ष त्यांना दिली, पाच वर्ष माझ्या सारख्या युवकाला साथ द्या असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जोर्वे येथे महीला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पीठाच्या गिरणीचे वितरण डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गावातील भजनी मंडळांना साहीत्याचे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले की, २००९ पासून या गावात विकासाची प्रक्रीया सुरू झाली. या वर्षात ना.विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहाता यापुर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले असा प्रश्न पडतो. शिर्डी विधानसभा मतदार संघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला.

कोव्हीड संकटात इथले लोकप्रतिनीधी कुठे होते, जेव्हा लोकांना औषधाची आणि रेमडिसिव्हरची गरज होती तेव्हा फक्त विखे पाटील परीवार सर्वाच्या सोबत उभा राहील्याचे सांगून जोर्व्यात एक कोव्हीड सेंटर टाकू शकले नाहीत. गावात पूर आला तेव्हा सुध्दा गावाकडे पाठ फिरवार्यांनी यांना लोकांनी पुरते ओळखले आहेत. जोर्वे गावात दशक्रीया विधीचा घाट बंधला. शेजारील गावांना इथे दशक्रीया विधी साठी यावे लागते पण काळजी करू नका प्रत्येक गावात दशक्रीया विधी घाट बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गेली अनेक वर्षे सर्व सत्ता स्थाने यांच्या कुटूबांच्या ताब्यात आहेत. तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी अनेक वर्षे पाहायला मिळतात. राहता तालुक्यात सर्व पदे सामान्य माणसाच्या ताब्यात आम्ही दिली इथे तर सहकारी संस्था नातेवाईकाच्या ताब्यात आहेत. आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथेतर सामान्य माणसाच्या आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना मोठ्या घडत आहे मग दहशत कोणाची असा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात समवाविष्ट झालेल्या गावांना मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून असलेले बचत गट केवळ कागदोपत्री नाहीत. या महील्यांच्या उदरनिर्वाहा करीता पीठाची गिरणी उपलब्ध करून देत आहोत. येणार्या काळात आणखीही साधन साहीत्य देवून महीलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे डॉ विखे म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारने अनेक योजना महीला युवक शेतकरी यांच्यासाठी सुरू केल्या.पण एक गोष्ट लक्षात ठेवा योजना युती सरकारच्या आहेत.पण फोटो लावून पत्रक वाटायचे काम विरोधी मंडळी करीत असल्याने महायुतीचे काम विरोधकांना सुध्दा मान्य आहे.पण युती सरकारचे काम लोकांना सांगण्याची वेळ विरोधकांवर आल्याची खोचक टिका डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.

अनेक वर्षे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न आहे.एक औद्योगिक वसाहत इथल्या लोकप्रतिनीधीना आणता आली नाही.साडेसात वर्षे मंत्री होते.पण ना.विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील औद्योगिक वसाहती करीता पाचशे एकर जागा मंजूर करून आणली आता उद्योग येण्यास प्रारंभ झाला असल्याची माहीती त्यांनी दिली.

विकास प्रक्रीयेच्या जोरावरच जोर्वे ग्रामपंचायती मध्ये युवकांनी विजय घडवला. आता तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या सहकार्याने असेच परीवर्तन आपल्याला घडवायचे आहे.तुमच्या पाहुण्यांना आणून इथली विकास काम दाखवा आणि आता नातेबाईकांना हळूहळू फोन करायला सुरूवात करा असे सूचक वक्तव्य करून पुन्हा संगमनेरातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

Web Title: Incidents of grabbing the land of adivasis are happening then who is afraid sujay vikhes on the opposition partys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 04:16 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
1

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

Sangli News: “सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण  होण्यासाठी…”; काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
2

Sangli News: “सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी…”; काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा’; पालकमंत्री विखे-पाटलांच्या सूचना
3

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा’; पालकमंत्री विखे-पाटलांच्या सूचना

अलमट्टी धरणाबाबतच्या बैठकीला गेले; मुंबईत वडापाव खाऊन आले
4

अलमट्टी धरणाबाबतच्या बैठकीला गेले; मुंबईत वडापाव खाऊन आले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.