Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य

ठाकरे बंधूंच्या युतीचा काही परिणाम होणार नाही. उलट जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असे वक्तव्य नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 28, 2025 | 05:57 PM
ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य

ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे बंधू एकत्र येण्याने कोणताही परिणाम नाही
  • अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य
  • मनपा जागावाटप अंतिम टप्प्यात
संगमनेर–अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सध्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना मंत्री विखे म्हणाले की, आज विरोधकांकडे उमेदवारच नाहीत. त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कोणीही जायला तयार नाही. ज्यांना डावलले जाईल, तेच विरोधकांचे उमेदवार असतील, असा टोला त्यांनी लगावला.

Daund Taluka News: रोटीतील जावळ विधीवरून दौंड तालुक्यात संताप; रूपाली चाकणकरांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

मालदाड (ता. संगमनेर) येथे आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ठाकरे बंधू जनतेसाठी नव्हे, तर केवळ एकमेकांच्या आधारासाठी एकत्र आले आहेत. मराठी माणूसच त्यांना हद्दपार करील, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा मुंबईसह राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.

उद्धव व राज ठाकरे यांची युती ही त्यांची राजकीय गरज आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही. त्यांच्या काळातच मराठी माणूस उध्वस्त झाला, याकडे लक्ष वेधत लोकांचा पूर्ण विश्वास आज महायुतीवर आहे, असा दावाही मंत्री विखे यांनी केला.

महायुतीवर जनतेचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ज्या वेगाने विकासाची प्रक्रिया सुरू आहे, त्याला मुंबईकर निश्चितच साथ देतील, असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

Nashik Child Skeleton Found: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा; चप्पल पाहून आईचा आक्रोश

या वेळी आमदार अमोल खताळ, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अमित नवले, भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चतर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, सूर्यभान नवले, हरिश्चंद्र चकोर, केशव जाधव, लहानू नवले, उत्तम नवले, परसराम नवले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाला तिलांजली देणारेच स्टार प्रचारक?

ज्यांनी स्वतःच्या तालुक्यात काँग्रेस पक्षाला तिलांजली दिली, तेच आज पक्षाचे स्टार प्रचारक झाले आहेत, याचे मला आश्चर्य वाटते, अशी टीकाही विखे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत राहणेच उचित ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे, असे सांगताना मतदारांच्या रंगीत फोटोसह नावांच्या याद्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत असतील, तर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Guardian of ahilyanagar radhakrishna vikhepatil on thackrey brother alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम
1

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
3

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

महाराष्ट्रात आज काय काय घडलं?… वाचा आजच्या घडामोडी !
4

महाराष्ट्रात आज काय काय घडलं?… वाचा आजच्या घडामोडी !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.