IND vs NZ 1st Test 3rd Day It was Eijaz Ahmed who First Destroyed the Indian batting line and opening pair of captain Rohit Sharma and Yashasvi Jaiswal showed way to Tent
Eijaz Ahmed IND vs NZ 1st Test 3rd Day : भारतीय वंशाच्या खेळाडूनेच टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरूंग लावत महत्त्वाच्या दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येण्याच्या अगोदरच त्याने भारतात राहून सुरू केला होता सराव. विशेष गोष्ट म्हणजे या खेळाडूने मुंबईत राहून हा सराव केला होता. या खेळाडूची सासरवाडीदेखील मुंबईतीलच आहे. या खेळाडूने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालला तंबूचा रस्ता दाखवत टीम इंडियासाठी मोठी कठीण परिस्थिती निर्माण केली होती. परंतु, सरफराज आणि विराटने डाव सावरला.
एजाज पटेलची भेदक गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला सुरूंग
#INDvNZ team India 🇮🇳 now at a score of 153/2 in the second inning!
Still training by more than 200 runs!
Bad luck 🍀 for Rohit sharma out on 52 runs ! See the wicket of #RohitSharma #TeamIndia pic.twitter.com/8cFMCG707a
— SK Gautam (@gautamrud) October 18, 2024
मुंबईत क्लब क्रिकेट खेळण्यास उत्सुक
मुंबईतील क्लब संघाकडून खेळण्यास एजाझ उत्सुक आहे. मी मुंबईत क्लब क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. तुमच्या नॅशनलकडूनही खेळू शकेन, असे एजाझने मला सांगितले. त्याच वेळी आयपीएलसाठी आपल्याला कोणी खरेदी करीत नाही, याचीही खंत त्याला आहे, असे मिठबावकर यांनी सांगितले. गुरुवारी एजाझ बेंगळुरूला न्यूझीलंड संघात दाखल होईल.
एकमेव कसोटीसाठी ग्रेटर नोएडा येथे आला
न्यूझीलंडचा संघ गेल्या महिन्यांत एकमेव कसोटीसाठी ग्रेटर नोएडा येथे आला होता. त्या वेळी एजाझने मुंबईतील सरावाबाबत दत्ता मिठबावकर यांच्याकडे विचारणा केली होती. मिठबावकर हे अफगाणिस्तान संघाचे भारतातील सामन्यांसाठी व्यवस्थापक होते. ‘फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर; तसेच खुल्या मैदानात एजाझला सराव करायचा होता. त्याने याबाबत मला विचारणा केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारीणीतील सदस्य नीलेश भोसले यांनी एजाझसाठी एमआयजी क्लबवर सुविधा उपलब्ध केली. तिथे त्याने दीड तास सराव केला. त्या वेळी वैभव अंकोलेकर याने फलंदाजी केली. एजाझने वैभवला गोलंदाजीबाबत काही सूचनाही केल्या,’ असे मिठबावकर यांनी सांगितले.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. लवकरच भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. येत्या 16 तारखेपासून भारताची पहिली कसोटी सुरू होणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाबरोबर तीन कसोटी सामने खेळणार आहे. पण कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा एकटा खेळाडू सराव करीत असल्याचे आता समोर आले आहे. हा न्यूझीलंडचा खेळाडू भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता. या खेळाडूने भारताला एकहाती पराभवाच्या छायेत ढकलले होते. आता पुन्हा एकदा भारताला धक्के देण्यासाठी तो आता न्यूझीलंडचा संपूर्ण संघ सराव करण्यापूर्वी एकटाच मैदानात उतरला आहे.
Ajaz Yunus Patel