Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS NZ Final : भारत Vs न्यूझीलंड फायनलचा फिव्हर! चाहत्यांसाठी ‘स्पेशल ट्रेन’ धावणार

भारतीय रेल्वेने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. विमानांच्या तिकिटांचे गगनाला भिडलेले दर आणि तिकिटांची टंचाई लक्षात घेता रेल्वेने नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:
  • एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय
  • मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन
  • चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयसीसीची खास तयारी
IND VS NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ‘टी-२० वर्ल्ड कप २०२६’ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतो आहे. हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी भारतीय रेल्वेने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. विमानांच्या तिकिटांचे गगनाला भिडलेले दर आणि तिकिटांची टंचाई लक्षात घेता रेल्वेने नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

US – Iran तणावाचा फटका! दुबईच्या विमान प्रवासाचे दर 80 टक्क्यांनी वाढले, युरोपलाही जाणं झालं महाग

विशेष ट्रेन दिल्लीहून रवाना होणार

उत्तर रेल्वेने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. आज ७ मार्च २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजता ही विशेष ट्रेन दिल्लीहून रवाना होणार आहे. १९ डब्यांच्या या ट्रेनमध्ये सेकंड एसी आणि थर्ड एसी कोचची व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे चाहत्यांना परवडणाऱ्या दरात आणि सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन

रेल्वेची ही विशेष सेवा केवळ दिल्लीपुरती मर्यादित नसून, पश्चिम रेल्वेनेही मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रविवारच्या अंतिम सामन्यासाठी देशभरातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने ही ‘तुफानी खेळी’ खेळली आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आपले स्थान निश्चित केले आहे. या दोन दिग्गज संघांमधील थरार पाहण्यासाठी १,३२,००० प्रेक्षक क्षमता असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरण्याची चिन्हे आहेत.

क्रिकेट प्रेमियों के लिए भारतीय रेल की खास सौगात! बढ़े फ्लाइट टिकट और टिकटों की अनुपलब्धता को देखते हुए रेलवे द्वारा यात्रियों की सहूलियत के लिए नई दिल्ली से साबरमती के लिए आज दिनांक 7 मार्च 2026, रात 11:45 बजे विशेष ट्रेन का ऐलान। 3rd AC और 2nd AC के कोच वाली इस 19 कोच की… pic.twitter.com/LQuMPByqln — Northern Railway (@RailwayNorthern) March 7, 2026

चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयसीसीची खास तयारी

मैदानातील क्रिकेटच्या रोमांचसोबतच चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयसीसीने (ICC) खास तयारी केली आहे. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी एक भव्य समारोप समारंभ पार पडणार आहे. यामध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी मार्टिन, ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह आपल्या आवाजाने स्टेडियम गाजवणार आहेत. नाणेफेकीपूर्वी होणारा हा म्युझिकल शो प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल. यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूडचा एक जबरदस्त मिलाफ अहमदाबादमध्ये पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे, अहमदाबादमध्ये वर्ल्ड कपची फायनल खेळण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून कोट्यवधी भारतीयांची मने तोडली होती. त्यामुळे यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्या पराभवाचा बदला घेण्याच्या आणि विजेतेपद पटकावण्याच्या जिद्दीने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रेल्वेच्या या विशेष सोयीमुळे हजारो चाहत्यांना स्टेडियमवर पोहोचून आपल्या संघाला पाठिंबा देणे आता सोपे झाले आहे.

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

Web Title: India vs new zealand t20 world cup 2026 final special train arranged from delhi to ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND W vs AUS W : Ellyse Perry ने रचला इतिहास, ही कामगिरी करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू
1

IND W vs AUS W : Ellyse Perry ने रचला इतिहास, ही कामगिरी करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू

IND vs NZ : सावधान संजू सॅमसन…आकाश चोप्राने केली आकाशवाणी! हा किवी वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी “मोठा धोका”
2

IND vs NZ : सावधान संजू सॅमसन…आकाश चोप्राने केली आकाशवाणी! हा किवी वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी “मोठा धोका”

IND vs NZ Playing 11 : अभिषेक शर्माचा पत्ता कट X फॅक्टर OUT! अंतिम सामन्यात भारत महत्त्वपूर्ण बदल करणार का?
3

IND vs NZ Playing 11 : अभिषेक शर्माचा पत्ता कट X फॅक्टर OUT! अंतिम सामन्यात भारत महत्त्वपूर्ण बदल करणार का?

IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम
4

IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.