नवी दिल्ली : एका मुलाखतीत गिल म्हणाले की, फर्ग्युसनने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (केकेआर) गेल्या दोन हंगामात चांगला खेळ दाखवला आहे आणि मला खात्री आहे की, तो आता गुजरातसाठीही असेच करेल.
किवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला गुजरात टायटन्सने 10 कोटींना विकत घेतले आहे. गेल्या मोसमात तो KKR च्या संघाचा भाग होता आणि IPL 2021 च्या 8 सामन्यात 17.23 च्या सरासरीने 13 बळी घेतले.