भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आणि प्रथा परंपरा आणि मान्यता प्राचीन काळापासून देशात पाळल्या जात आहे. ग्रामीण भागात याचा मोठ्याप्रमाणात पगडा पाहायला मिळतो. आपल्या देशात शकुन अपशकुन, श्रद्धा अंधश्रद्धा ही खूप मानले जातात. ही पद्धतआपल्याकडे शेकडो वर्षापासून चालत आलेले आहे. काही व्यक्ती याकडे प्रथेने पाहतात. तर काही व्यक्तींना है अंधश्रद्धा वाटते. परंतु पूर्वीपासून ही पद्धत चालतआली असल्याने आपल्याही मनात या विषयी थोडी भीती आणि थोडीशी उत्सुकताही वाटत असते. आपल्याला हे जाणून घ्यायचे असते की हे खरोखर आहे का जाणून घेणार आहोत. पुण्याला मांजर विषय असे म्हटले जाते जर काही महत्त्वाच्या कामासाठी घरा बाहेर पडलो आणि रस्त्यात एखादे मांजर आडवे गेले तर तो अपशकून मानला जातो.
[read_also content=”डिस्पोजलमध्ये चहा पिणाऱ्यांनो नक्की वाचा; अन्यथा येईल पश्चातापाची वेळ https://www.navarashtra.com/latest-news/do-you-drink-tea-in-disposal-then-must-read-the-dispadvantages-nrng-167279.html”]
किंवा खूपच महत्त्वाचे काम असेल तर थोडावेळ एखाद्या झाडाखाली किंवा हॉटेलमध्ये थांबून पाणी प्यावे मगच पुढे जावे. तरच आपले ते काम पूर्ण होते. नाहीतर आपल्याला त्यात अपयश येते. असे मानले जाते की एखाद्या वेळेस आपण जात असताना मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपल्याला प्रवासात काही दुखापत होऊ शकते. किंवा आपले नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की मांजर आडवी जाणे अशुभ आहे. याचा खरा अर्थ असा आहे की पुढे काही घटना घडणार असतील तर त्याचा पूर्व भास मांजरीला पूर्वीच होऊन जातो. म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्यासाठी मांजर आपल्या मार्गात आडवी जाते. म्हणजे त्या संकटापासून आपण सावध राहू शकतो म्हणूनच ज्यावेळी मांजर आपल्याला आडवी गेली की समजून जावे आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि त्यासाठी मनाची तयारी करून ठेवावी.
परंतु मांजर रस्त्याने आडवी जाणे नेहमी अशुभ नसते.. मांजर आपल्या डाव्या बाजूला गेली आहे की उजव्या बाजूला यावरून त्याचे शुभ अशुभ परिणाम दिसून येतात शकुन शास्त्रानुसार डाव्या बाजूने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही परंतु जर मांजर आपल्या उजव्या बाजूने गेली तर ते अशुभ मानले जाते. म्हणूनच मांजरी ने आपल्या उजवीकडून रस्ता ओलांडला असेल तर थोडा वेळ थांबावे व मगच पुढे जावे. मांजरी विषयी अनेक शुभ अशुभ बाबी शकून शास्त्रात दिलेले आहेत.
(धार्मिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)






