Ishan Kishans strong reply to the selection committee by making hundred with raining fours and sixes
Ishan Kishan Century Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन हा अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू आहे आणि त्याने हे पुन्हा सिद्ध केले. दुलीप ट्रॉफी २०२४ सऱ्या टप्प्यात, त्याला शेवटच्या क्षणी भारत सी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आणि त्यानंतर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने भारत ब संघाविरुद्ध प्रथण श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील साातवे शतक झळकावले. इशान किशनचा या मोसमातील हा पहिलाच सामना असून, पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावून आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याबरोबर टीम इंडियासाठी पुन्हा खेळण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
इशान किशनचे झंझावती शतक
Ishan Kishan has brought up his💯 against India B in the #DuleepTrophy2024 🔥#firstclass #Cricket #century pic.twitter.com/gHWObUnyKl — Cricbuzz (@cricbuzz) September 12, 2024
इशान किशनने झळकावले शतक
देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग न घेतल्याने इशान किशनला या हंगामात बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते, परंतु आपली चूक सुधारत त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबर मैदानत परतताच शतकी खेळी केली. इशान किशनने या सामन्यात १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने २ षटकार आणि १४ चौकार मारले. या सामन्यात इशान किशनने १२६ चेंडूंचा सामना करीत ३ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १११ धावा केल्या आणि तो मुकेश कुमारच्या चेंडूवर बाद झाला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन
आता इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे नाव संघात नव्हते, पण तरीही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. दुखापतीमुळे तो पहिला सामना खेळू शकला नव्हता, मात्र दुसऱ्या सामन्यात तो अचानक संघात आला आणि त्याने दमदार शतक झळकावले. मात्र, या सामन्यात तो फलंदाज म्हणून खेळत आहे, कारण त्याच्या संघात अभिषेक पोरेल यष्टिरक्षक म्हणून खेळत आहे. इशान किशनने चौथ्या क्रमांकावर खेळत हे शतक झळकावले आहे.
इशान किशनने बुची बाबू स्पर्धेतही झळकावले होते शतक
दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यापूर्वी, इशान किशन बुची बाबू स्पर्धेत खेळत होता आणि तिथेही त्याने या मोसमात शतक झळकावले होते. इशान किशनच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, या सामन्यापर्यंत त्याने ५० सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये त्याने ३०६३ धावा केल्या आहेत आणि ६ शतके ठोकली आहेत. इशान किशनची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या २७३ धावा आहे. त्याने या सामन्यांमध्ये विकेटच्या मागे १०१ झेलही घेतले आहेत तर ११ खेळाडूंना स्टंप आऊट करण्यात यश मिळवले आहे.