Israeli troops extend withdrawal deadline from Lebanon
बेरुत: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धविराम सुरु असताना अनेक अडथळे निर्माण होते आहेत. तर दुसरीकडे हिजबुल्लाह सोबत झालेल्या युद्धविराम करारात देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधून इस्रायली सैन्य माघारी घेण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात संघर्षविराम झाला होता.
60 दिवसांची मुदत संपुष्टात
या हिजबुल्लाह करारातंर्गत इस्त्रायलला लेबनॉनमधून आपले सैन्य माघारी घेण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 25 जानेवारी 2025 ला संपुष्टात आली मात्र, अजूनही इस्त्रायल सैन्य लेबनॉनमधून पूर्णत: परतलेले नाही. त्यानंतर इस्त्रायलने मुदत वाढची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून 18 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. खरं तर दक्षिण लेबनॉनच्या भागत सैन्य तैनात करण्याचा इस्त्रायलचा प्रयत्न सुरु होता मात्र, हिजबुल्लाहने हा प्रयत्न पूर्ण होऊ दिला नाही.
फ्रान्स आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला होता संघर्षविराम
गेल्या वर्षात इस्त्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध होते. हमास, हिजबुल्लाह आणि इराणशी इस्त्रायलचा संघर्ष सुरु होता. जागतिक स्तरावर यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संघर्षविमारामासाठीू तयार होत नव्हते.
मात्र, अमेरिका आणि फ्रान्सने मध्यस्थी करुन इस्त्रायल आणि हिजबुल्लाहत युद्धविराम घडन आणला. त्यानंतर इस्त्रायलने सैन्य माघारीसाठी 60 दिवसांच्या युद्ध बंदीचा करार मान्य केला. युद्धबंदी झाल्यानंतर काही तासांतच उत्तरी लेबनॉनमधून लोक दक्षिणी लेबनॉनला परतले.
सैन्य माघारी घेत असताना निदर्शकांवर गोळीबार
इस्त्रायली सैन्य माघारी जाण्याच्या मागणीत वाढ करत असताना 26 जानेवारी रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये निदर्शने काढण्यात आली होती. या निदर्शनांत युद्धंबंदी करारानुसार इस्त्रायली सैन्याने माघारी जाण्याच्या घोषाणा देण्यात आल्या. याच दरम्यान सैन्याने निदर्शकांवर गोळीबार केला. लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात 22 जणांचा मृत्यू तर 124 जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिला आणि एका लेबनीज लष्करी सैनिकाचा समावेश होता. या गोळीबारात सीमावर्ती भागातील 20 गावांमधील लोक जखमी झाले.