डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी; फ्लोरिडात एका संशयिताला पोलिसांकडून अटक(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अनेक कठोर निर्णय घेतले. सध्या त्यांच्या निर्णयामुळे ते जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. याचदरम्यान त्यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. यासंबंधित पोस्ट करणाऱ्या फ्लोरिडामधील एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
ही अटक FBIकडून मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आली असून 46 वर्षीय एटकिंसने सोशल मीडियावर धमकीचे अनेक पोस्ट केले होते, यामध्ये ट्रम्प यांना थेट लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे ट्रम्प यांनी धमकवण्याच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या शॅनन एटकिंस नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेले होते.
सोशल मीडियावरील पोस्ट
इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधी शॅनन एटकिंसने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “अमेरिकेला वाचवण्यासाठी फक्त एक गोळी पुरेशी आहे.” या पोस्टच्या आधारे शॅनन ला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅननला फ्लोरिडातील पाम बीचच्याजवळ शुक्रवारी अटक करण्यात आली. अटकेवेळी शॅननकडे सापडलेले कोकेन ड्रग्ज देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
FBI आणि सीक्रेट सर्व्हिस अलर्टमोडवर
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. निवडणुक प्रचारदारम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. यामुळे सध्या FBI आणि सीक्रेट सर्व्हिस हाय अर्लटमोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या सुरक्षिततेला मोठे महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत शॅनन एटकिंसच्या सोशल मीडिया पोस्टने सुरक्षा यंत्रणांना आणखी दक्ष बनवले आहे.
एटकिंसची प्रतिक्रिया आणि पोलिसांचे विधान
या पोस्टविरोधात शॅनन एटकिंसने दावा केला आहे की, त्याने केलेली ही पोस्ट केवळ विनोद म्हणून लिहिण्यात आली आहे. मात्र, वेस्ट पाम बीचचे पोलिस प्रमुख टोनी अराउजो यांनी स्पष्ट केले की, “आजच्या काळात अशा प्रकारचे विनोद धोकादायक ठरू शकतात. हे कोणत्याही परिस्थितीत गंभीर आहे.”
पोलिसांनी त्याचे अन्य पोस्टही उघड केले असून त्यात त्याने लिहिले होते की, “इतिहास पुन्हा घडतोय. इथे वर्षानुवर्षे हत्या झालेली नाही.” सध्या शॅनन एटकिंसवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप असून डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुसऱ्या डिग्रीची गुन्हा श्रेणी आहे. पुढे, सीक्रेट सर्व्हिस निर्णय घेणार आहे की त्याच्यावर संघीय आरोप लावायचे की नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घटनेतून हे सिद्ध होते की, सोशल मीडियावरील धमकीच्या पोस्ट्स गांभीर्याने घेतल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी FBI आणि सीक्रेट सर्व्हिस अत्यंत सावध आहेत. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली जात असून, पुढील कायदेशीर पावले लवकरच उचलले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.