Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षीरसागर काका पुतण्यातील संघर्ष पुन्हा पेटला; बीड शहरातील विकास कामाच्या प्रश्नावरून काका-पुतणे आमनेसामने

काका-पुतण्याच्या वादात बीडच्या जनतेस वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. दोघांच्या वादात जनतेच्या विकासाचा निधी पळवला असल्याचं देखील आता नागरिक बोलू लागलेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 04, 2021 | 02:19 PM
क्षीरसागर काका पुतण्यातील संघर्ष पुन्हा पेटला; बीड शहरातील विकास कामाच्या प्रश्नावरून काका-पुतणे आमनेसामने
Follow Us
Close
Follow Us:

बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचं काम करत असल्याचा आरोप काका जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. बीड विधानसभा मतदारसंघात पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. यानंतर या दोघांमधे सुरु झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे.

त्यातच डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांना कोंडीत पकडलं, त्यामुळे भारतभूषण क्षीरसागर चांगलेच संतापले आहेत.

बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार क्षीरसागर शहराच्या विकास कामात कसा अडथळा आणतायत, यावर लक्ष वेधले. जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेला वेगळा न्याय आणि बीड नगरपरिषदेला वेगळा न्याय का? असा सवाल भारतभूषण क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेत नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी आपले चुलत बंधू संदीप क्षीरसागर यांनी शहरासह ग्रामीण भागाची कशी वाट लावली, याचा व्हिडिओ दाखवून त्यांच्या कामाची पोलखोल केली. येणाऱ्या काळात प्रलंबित प्रश्‍न मार्गी न लागल्यास नगरपरिषदेच्या नगरसेवकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय.

दरम्यान काका-पुतण्याच्या वादात बीडच्या जनतेस वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. दोघांच्या वादात जनतेच्या विकासाचा निधी पळवला असल्याचं देखील आता नागरिक बोलू लागलेत.

दरम्यान याविषयी संदीप क्षीरसागर यांनी बोलणं टाळलं असून प्रत्येक वेळी राजकीय कुरघोडी करणाऱ्या काकांवर यावेळी पुतण्याने कुरघोडी केलीय. नगर परिषदेचा निधी त्यांनी पळवल्याचा आरोप केल्याने बीडचं राजकारण चांगलेच तापलं आहे. मात्र याचा नाहक फटका बीडच्या जनतेला सहन करावा लागतोय.

Web Title: Kshirsagar uncle and nephew face to face over the issue of development work in beed city nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2021 | 02:19 PM

Topics:  

  • Beed district

संबंधित बातम्या

आधी पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले, नंतर पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार; बीडमध्ये दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा
1

आधी पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले, नंतर पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार; बीडमध्ये दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.