Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! 'इतक्या' जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
Police Recruitment: राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 15 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेले अनेक महीने हजारो तरूण, तरुणी पोलिस दलात भरती होण्यासाठी मेहनत घेत आहेत. आता लवकरच ही भरती केली जाणार आहे.
राज्यात 15 हजार पदांसाठी पोलिस भरती केली जाणार आहे. त्याबाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर तरूण-तरुणींचा पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आज शासन निर्णय जारी करण्यात आल्याने हजारो तरुणांचे पोलिस दलात सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
काय आहे शासन निर्णय?
राज्य सरकारने पोलिस दलातील 15, 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाअंतर्गत जानेवारी 2024 पासूनची पदे भरण्यात येणार आहेत. पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बॅन्ड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी भरती केली जाणार आहे. कारागृह शिपाई पदासाठी देखील भरती केली जाणार आहे.
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी
राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या भरतीच्या माध्यमातून हजारो तरूणांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. राज्यसरकारच्या (Mahayuti Sarkar) या घोषणेनंतर लवकरच पोलीस भरतीसंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल. यामाध्यमातून पोलीस दलालाही नवी ऊर्जा मिळणार असून पोलीस दलाची ताकदही वाढणार असल्याचाविश्वास व्यक्त केला जातोय. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ आता जवळपास एक वर्ष होत आले, गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून तरूण पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. त्यामुळे पोलीस भरतीचा निर्णय कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानंतर या बातमीने तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अधिकृत संकेतस्थळांवर (उदा. Maharashtra Police Recruitment पोर्टल) ही भरती कधी, कशी आणि कुठे सुरू होईल, याची प्रकाशित जाहिरात बघत रहा. अधिकार्यांच्या सूचना वाचणे: न्यायालयीन नोटीस आणि सरकारी निर्णयांबाबत पुढील माहिती मिळवत रहा, ज्यामुळे भरतीच्या तारखा आणि प्रक्रिया स्पष्ट होतील.