Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2025 | 09:55 PM
CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा 'हा' विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा 'हा' विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार  रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. प्रथम रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

अमरावती विभागातील मदतीचा आढावा

(१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

जिल्हा                 रुग्णसंख्या               मदत रक्कम

बुलढाणा                443                    3,67,89,000

अकोला                 265                    2,36,44,000

अमरावती               231                    2,21,45,000

वाशीम                  139                    1,35,80,000

यवतमाळ               109                    99,53,000

या आजारांसाठी मिळते मदत

  • कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)
  • हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण
  • कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)
  • रस्ते अपघात
  • बालकांच्या शस्त्रक्रिया
  • हिप व गुडघा रिप्लेसमेंट
  • मेंदूचे आजार, डायलिसिस, अस्थिबंधन
  • बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण
  • नवजात शिशुंचे आजार इत्यादी २० प्रकारच्या गंभीर आजारांसाठी मदत प्रदान केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
  • रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड
  • रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)
  • तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी)
  • वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
  • एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)
  • ZTCC पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात पुढील ईमेलवर पाठवा: aao.cmrf-mh@gov.in

CM Relief Fund: रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ठरतोय आधार; 3,542 रुग्णांना 32 कोटींची मदत

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 वर संपर्क साधावा.

“संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कक्षात केलेल्या  विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत आणि खऱ्या गरजूंपर्यंत निधी पोहोचत आहे.”

— रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र

Web Title: Cm devendra fadnavis cm relief fund help amravati 1187 patients for 10 crore rs health marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • amravati
  • CM Devendra Fadnavis
  • Health News
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?
1

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?

“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश
2

“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
3

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

HIV cases in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये १८३ ‘एचआयव्ही’ बांधितांची नोंद
4

HIV cases in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये १८३ ‘एचआयव्ही’ बांधितांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.