Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंना माजी NSG कमांडोचा सवाल; ’26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तुमचे योद्धे कुठे होते?’

"प्रवीण तेवतिया यांनी 26/11 च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 06, 2025 | 01:22 PM
राज ठाकरेंना माजी NSG कमांडोचा सवाल; ’26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तुमचे योद्धे कुठे होते?’
Follow Us
Close
Follow Us:

Three Language Policy:  महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक माजी एनएसजी कमांडोने थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रवीण कुमार तेवतिया असे या माजी सैनिकाचे नाव असून, त्यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते.

प्रवीण तेवतिया यांनी त्यांच्या ट्विटर एक्स वरून  राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहे. “मुंबईवर हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?” तसेच, “मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं. देशाला भाषेच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करू नका,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या वक्तव्यामुळे हिंदीविरोधी वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यात ते मरीन कमांडो फोर्स (मार्कोस)च्या गणवेशात हसताना दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर ‘UP’ असे स्पष्ट लिहिलेले आहे आणि त्यांच्या हातात रायफलही दिसत आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “मी उत्तर प्रदेशचा आहे, पण मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं. ताज हॉटेल वाचवलं. 26/11 च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. त्या वेळी राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच,”देशाचे भाषेच्या आधारे विभाजन करू नका. आनंदाला आणि माणुसकीला कोणतीही भाषा लागत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.

“प्रवीण तेवतिया यांनी 26/11 च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे. तेवतिया हे 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत किमान 150 लोकांचे प्राण वाचवले. या मोहिमेदरम्यान प्रवीण यांना गंभीर जखमा झाल्या होत्या — चार गोळ्या लागल्या, तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र

दरम्यान, शनिवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित मेळावा पार पडला. यामध्ये दोघांनीही मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकजूट दर्शवली. दोघांनीही मराठी भाषा जपण्याचे आणि वापरण्याचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र

 शनिवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित मेळावा पार पडला. यामध्ये दोघांनीही मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकजूट दर्शवली. दोघांनीही मराठी भाषा जपण्याचे आणि वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करत एकसुरात भूमिका मांडली.

Web Title: Maharashtra politics former commando questions raj thackeray where were your warriors during the attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील
1

Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर
2

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?
3

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
4

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.