Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गेल्या 6 महिन्यांपासून हार्दिकने…त्याची कायम निष्ठा…’,भाऊ कृणाल पांड्या झाला व्यक्त

हार्दिकला कोणीही काहीही बोलत होता, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील बोलले गेले, त्याच्या मनाचा विचारसुद्धा केला नाही, अशी भावूक पोस्ट कृणाल पांड्याने आपल्या लाडका भाऊ हार्दिककरिता टाकली आहे. टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी भाऊ कृणाल पांड्याने भावूक पोस्ट सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 06, 2024 | 05:23 PM
Emotional post for Krunal Pandya's brother Hardik

Emotional post for Krunal Pandya's brother Hardik

Follow Us
Close
Follow Us:

Krunal Pandya has Posted an Emotional Post : ‘खरोखर मागील सहा महिने हार्दिकसाठी अत्यंत कठीण होते. त्याला वाट्टेल ते बोललं गेलं. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर नको ते बोलंल गेले. त्याच्या मनाचा कोणीही विचार केला नाही, याचं मला अतिशय वाईट वाटलं’, अशा शब्दात हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याने भावुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई इडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर जोरदार ट्रोलिंग

वर्ल्डकपविजेता भारतीय संघ मायदेशी परतला. दिल्लीत पंतप्रधानांनी संघाची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत नरिमन पॉइंट परिसरात व्हिक्टरी परेड काढण्यात आली. भारताच्या वर्ल्डकप विजयात हार्दिकने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर हार्दिक हार्दिक, असा जयघोष पाहायला मिळाला. पण, याच मैदानावर काही महिन्यांपूर्वी हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाने हंगामापूर्वी हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती केली. मुंबई इंडियन्स संघाला ५ जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे हार्दिकवर सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष मैदानातही जोरदार टीका-ट्रोलिंग करण्यात आले. त्यातच मुंबई इंडियन्सची कामगिरी यथातथाच राहिल्याने टीकेचं प्रमाण वाढलं.

हार्दिकचा मला प्रचंड अभिमान

कृणालने इन्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘हार्दिक आणि मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला सुरू करून जवळपास दहा वर्षे झाली. गेले काही दिवस आमच्यासाठी स्वप्नवत होती. बाकी भारतीयांप्रमाणे वर्ल्डकपविजयाचे स्वप्न मी पाहिलं होतं, ते भारतीय संघाने प्रत्यक्षात साकारलं. माझा भाऊ वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग होता. फायनलमध्ये त्याने निर्णायक भूमिका बजावली. हार्दिकचा मला प्रचंड अभिमान वाटतो’.

काय म्हणाला कृणाल पांड्या पोस्टमध्ये
‘मागील सहा महिन्यांचा काळ हा हार्दिकच्या आयुष्यातला सगळ्यात खडतर काळ होता. त्याच्याबाबतीत जे घडलं तसं तो काहीच वागला नव्हता. त्याची काहीच चूक नव्हती. तो त्याचं काम करीत होता. एक भाऊ म्हणून, क्रिकेटपटू म्हणून आणि माणूस म्हणून मला अतिशय वाईट वाटत होतं. मैदानात तसंच सोशल मीडियावर त्याची हुर्यो उडवण्यात आली. वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ देऊन वाट्टेल ते बोलण्यात आलं. हे सगळं बोलताना, लिहिताना लोक हे विसरले की हार्दिक हाही माणूसच आहे. त्यालाही भावभावना आहेत, मन आहे. त्याने या कठीण काळाला चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन तोंड दिलं. त्याच्यासाठी हे किती कठीण होतं याची मला पूर्ण कल्पना आहे. तो मेहनत करत राहिला.

हार्दिकने खाचखळग्यांनी भरलेली वाट केली पार 

वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यासाठी जे योगदान त्याला द्यायचा होतं त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले. ते त्याच्या खेळातून दिसलं. भारताने वर्ल्डकप जिंकला- हे हार्दिकसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सहाव्या वर्षापासून तो खेळतो आहे. भारतासाठी खेळायचं आणि वर्ल्डकप जिंकायचा हे त्याचं स्वप्न होतं. खाचखळग्यांनी भरलेली वाट पार करत त्याने जिद्दीने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे’.

भारतीय संघाप्रती त्याची निष्ठा अढळ

‘हार्दिकवर टीका करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की अतिशय कमी कालावधीत अविश्वसनीय वाटावीत अशी यशोशिखरं त्याने गाठली आहेत. भारतीय संघाप्रति त्याची निष्ठा अढळ आहे. हार्दिकला कारकीर्दीत अनेकदा टोकाच्या टीकेला-ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. लोकांनी त्याला सपशेल निकालीही काढलं आहे. पण याने त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला नाही. त्याने त्याच्या खेळातून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे’.

हार्दिकसाठी देश हे सर्वोच्च प्राधान्य

‘हार्दिकसाठी देश हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पुढेही तेच राहील. बडोद्याच्या एका मुलाकरता आपल्या देशासाठी वर्ल्डकप जिंकून देता येणं यापेक्षा आनंद आणि समाधान देणारं दुसरं काहीच नाही. हार्दिक, तुझा प्रचंड अभिमान वाटतो. आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला चाहत्यांचं जे प्रेम मिळतं आहे त्याचा तू हकदार आहेस. तुझ्या आयुष्यात आता चांगल्याच गोष्टी घडतील’.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अन् तुझा अभिमान
वर्ल्डकपची फायनल विशेषत: हार्दिकने टाकलेली शेवटची ओव्हर बघताना कृणालला अश्रू आवरले नाहीत. आईबरोबर ती मॅच बघतानाचा व्हीडिओ कृणालने शेअर केला आहे. पोस्टबरोबर कृणालने हार्दिकचे लहानपणापासूनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

Web Title: Many personal attacks on hardik everyone was saying whatever they wanted no one even thought about his heart emotional post for krunal pandyas brother hardik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 04:48 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • ICC T20 World Cup 2024
  • indian cricket team
  • krunal pandya

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
2

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
3

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
4

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.