“गप्प नाही बसायचं…”, अभिनेत्याचे अश्लील मेसेज प्रकरण; प्राची पिसाटला मराठी इंडस्ट्रीतून पाठिंबा
दीपा परब आणि धनश्री काडगांवकर स्टारर ‘तू चाल पुढं’ मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल महत्वाचे वृत्त समोर येत आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेमध्ये अभिनेत्री प्राची पिसाटनेही प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये तिने ताराची भूमिका साकारली होती. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्राची पिसाट सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्राचीला एका ज्येष्ठ अभिनेत्याने केलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे ती चर्चेत आली आहे. सध्या तिला आलेला मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री प्राची पिसाटला ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर यांनी फेसबुकवरुन काही अश्लिल मेसेजेस पाठवलेले आहेत. त्या मेसेजचा स्क्रिनशॉट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केलेला आहे. सुदेश म्हशिळकर प्राचीला फेसबूकवर वारंवार मेसेज करून तिला त्रास देत असल्याचं उघडकीस आलं आहे. अभिनेत्रीने सुदेश यांच्या मेसेजेचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. फेसबूकवरुन सुदेश यांनी प्राचीला मेसेज केलेला पाहायला मिळत आहे.
प्राचीने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये सुदेश म्हशिळकर तिला म्हणतात की, “तुझा नंबर पाठवना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेयस” तर पुढच्या स्क्रिनशॉटमध्ये सुदेश म्हशिळकर म्हणतात, “खूपच सेक्सी दिसायला लागलीये, हल्ली… वाह…”
“माझं लग्न झालं होतं, पण…”, शेवंता लग्नसंस्थेबद्दल जरा स्पष्टच बोलली
हे स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने सुदेश यांना चोख उत्तर दिलं आहे. “…आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच…ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का…मला धमकावून, प्रेशर आणून पोस्ट डिलीट करायला सांगून गप्प राहायला सांगितलं. त्यामुळेच मला वाटतं की ही पोस्ट आता माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी, अशी आता माझी इच्छा झालीये. चला विषय संपवुया…जोपर्यंत सुदेश म्हशिळकर गोड अपोलोजी पोस्ट करत नाही. तेदेखील माझ्या नंबर वर वाही तर फेसबुकवर…माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते”, असं तिने म्हटलं आहे.
प्राचीच्या या पोस्टवर सगळ्यांनीच संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राचीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सुदेश सध्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत काम करत आहेत. प्राचीने केलेल्या या आरोपांवर अद्याप सुदेश यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, हे मेसेज सुदेश यांनीच केलेच आहेत की त्यांचं अकाउंट हॅक झालंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.