तृप्ती डिमरीने घेतली दीपिका पादुकोणची जागा, प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटातून 'नॅशनल क्रश' करणार टॉलिवूडमध्ये डेब्यू
संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर अभिनेत्रीची एक से बढकर एक चित्रपटांमध्ये वर्णी लागली होती. त्या दरम्यान आता अभिनेत्रीचं पुन्हा एकदा नशीब फळफळलं आहे. बाहुबली फेम प्रभाससोबत ती ‘स्पिरिट’ चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत होती. दीपिका चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी अभिनेत्री तृप्ती डिमरीला मेगा बजेट चित्रपटामध्ये महत्त्वाचा रोलसाठी कास्ट केले आहे. तृप्तीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाची ही माहिती दिली आहे. त्यामुळे तृप्तीला दीपिकाच्या जागी काम करण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
“माझं लग्न झालं होतं, पण…”, शेवंता लग्नसंस्थेबद्दल जरा स्पष्टच बोलली
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपट हा ॲक्शन-ड्रामा आहे. तर त्या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार यांच्याकडून केली जाणार आहे. अभिनेता प्रभास ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटानंतर आता ‘स्पिरिट’साठी सज्ज झाला असून हा चित्रपट त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. चित्रपटामध्ये प्रभास एका कठोर आणि सखोल वृत्तीचा असलेला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. जो भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीविरुद्ध लढताना आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेमध्ये अभिनेता एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘स्पिरिट’मध्ये सामाजिक न्याय, कायद्याचा प्रभाव, आणि व्यक्तिगत संघर्ष यांचा सुरेख मिलाफ दाखवण्यात येणार आहे.
विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्पिरिट’ चित्रपटामध्ये जरीही तृप्ती डिमरी मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असून याआधी दीपिका पदुकोणचे नाव चर्चेत होते. पण नंतर तृप्तीची निवड करण्यात आली. ‘स्पिरिट’ चित्रपटाची शुटिंग वेगवेगळ्या देशांमध्ये होणार असून त्यात अॅक्शन, ड्रामा आणि थराराचा जबरदस्त संगम पाहायला मिळेल. ‘स्पिरिट’ हा सिनेमा हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे, कारण त्याचा विषय व्यापक असून प्रभासचा ग्लोबल फॅनबेस देखील मोठा आहे. हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ‘स्पिरिट’ एक मोठा आकर्षण ठरणार असून त्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
डिजिटल दुनियेतली मस्ती ‘त्या’ तिघांच्या अंगलट येणार का ? ‘आंबट शौकीन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
तृप्ती डिमरी आणि संदीप रेड्डी वांगा दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी, तृप्तीने वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात काम केले होते ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. ‘स्पिरिट’ व्यतिरिक्त, अभिनेत्रीकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि शाहिद कपूरचा ‘अर्जुन उस्तारा’ आणि ‘धडक २’ असे दोन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.