MNS leader Raj Thackeray abused by migrant Sujit Dubey political news
Immigrant target raj Thackeray : मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यावरुन राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात मुगरुरी करणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठवला आहे. मराठी माणसांना त्रास देणाऱ्या परप्रांतीयांना मनसे स्टाईल दणका देखील बसला आहे. यानंतर आता मात्र एक परप्रांतीयाने थेट राज ठाकरे यांना शिवीगाळ केली असल्याचे समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अंधेरी परिसरात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे अंधेरीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मनसे नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे हे अनेकदा परप्रांतीयांविरोधात भूमिका घेत असतात. तसेच मराठी लोकांना आणि मराठी तरुणांना संधी देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. अंधेरीमधील एका परप्रांतीय तरुणाने राज ठाकरेंना दारुच्या नशेमध्ये मारहाण केली आहे. घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. व्हिडीओत सुजित दुबे दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्रचंड संताप पसरला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंना शिवीगाळ करणारा सुजित दुबे हा परप्रांतीय असून त्याचे अवैध धंदे देखील आहेत. सुजित दुबे याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या तीन अनधिकृत धंद्यांवर तातडीने बंदी घालण्याची मागणीही मनसेने केली आहे. जर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई झाली नाही, तर पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपने मुंबई शहराध्यक्ष पदाची धुरा बदलली
भाजपने मुंबईत मोठा खांदेपालट केला आहे. मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अमित साटम मुंबई पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं आहे. गेल्या तीन टर्मपासून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. मुंबईतील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसबा आणि प्रत्येक व्यासपीठावर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. अमित साटम यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला आहे.